Ravi Shastri: रोहितनंतर कोणी करावे वनडेत भारतीय संघाची कॅप्टन्सी? रवी शास्त्रींनी सांगितले नाव

रवी शास्त्रींनी भारताच्या भविष्यातील कर्णधाराबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
Ravi Shastri
Ravi Shastri Dainik Gomantak
Published on
Updated on

Ravi Shastri on Team India's Next Captain: भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्वाबद्दल गेल्या काही वर्षात सातत्याने चर्चा होत आहे. सध्या भारताचे वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे, तर हार्दिक पंड्या टी20 क्रिकेटमध्ये नेतृत्व करतोय. याचदरम्यान माजी क्रिकेटपटू आणि भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री

रोहितकडे 2021 च्या अखेरीस भारताच्या वनडे आणि टी20 संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. तसेच 2022 च्या सुरुवातीला त्याला कसोटी संघाचेही कर्णधारपदही देण्यात आले. पण 2022 च्या अखेरीस हार्दिक पंड्याचा टी20 कर्णधार म्हणून उदय झाला.

दरम्यान रोहितच्या नेतृत्वात आत्तापर्यंत भारताला दोन आयसीसी स्पर्धांमध्ये अपयश आले आहे. त्यानंतर त्याच्या नेतृत्वावर टीकाही होत आहे. तसेच भारताच्या नेतृत्वात बदल करण्याचीही अनेकांकडून मागणी केली जात आहे. याबद्दल आता शास्त्रींनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Ravi Shastri
Champions Trophy 2013: धोनीचा 'तो' सल्ला अन् टीम इंडिया बनली चॅम्पियन, वाचा त्या अविस्मरणीय विजयाची कहाणी

शास्त्री यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की 2023 वनडे वर्ल्डकपनंतर नव्या खेळाडूकडे संघाचे नेतृत्व सोपवले जायला हवे. शास्त्री यांनी वनडे कर्णधारपदासाठी हार्दिकचे नावही सुचवले आहे.

शास्त्री यांनी द वीकला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की 'मला वाटते की हार्दिक पंड्याचे शरिर सध्या कसोटी क्रिकेटचा दबाव सांभाळण्यासाठी तयार नाही. पण, जर 2023 वर्ल्डकपनंतर तो तंदुरुस्त असेल, तर त्याने मर्यादीत षटकांसाठी (वनडे आणि टी20) त्याने नेतृत्वाची जबाबदारी घेतली पाहिजे.'

Ravi Shastri
Argentina Team in India: मेस्सी अन् सुनील छेत्री आमने-सामने आले असते, अर्जेंटिनाने प्रस्तावही दिलेला; पण...

शास्त्री यांनी असेही सांगितले की भारतीय क्रिकेटमधून वरिष्ठ खेळाडूंना वगळण्याची आणि युवा खेळाडूंना स्थान देण्याची वेळ आली आहे. शास्त्री म्हणाले, 'संघातील वरिष्ठ खेळाडूंनी बाहेर जाण्याच्या टप्प्यासाठी तयार रहावे आणि युवा खेळाडूं संधीसाठी तयार आहेत. विशेषत: टी20 क्रिकेटमध्ये हे लगेच व्हावे आणि मग वनडे आणि कसोटीत हळुहळू व्हावे.'

'कारण आयपीएलमध्ये तुम्ही मर्यादीत षटकांसाठी अनेक प्रतिभा असलेले कौशल्यपूर्ण खेळाडू पाहिले. पण तरी खेळाडूंनी हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की मर्यादीत षटकातील यश त्यांना कसोटीतही जागा मिळवून देण्याची खात्री देत नाही.'

दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे नुकतेच 12 जुलैपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील कसोटी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यातील कसोटी मालिकेतून चेतेश्वर पुजारा, उमेश यादव अशा खेळाडूंना वगळण्यात आले असून ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल यांना पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com