Ravi Bishnoi Debut: वेस्ट इंडिजविरुद्ध रवी बिश्नोई खेळणार पहिला T20 सामना

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात (India vs West Indies, 1st T20) हरियाणाचा हा (Ravi Bishnoi) लेगस्पिनर खेळताना दिसणार आहे.
Ravi Bishnoi
Ravi BishnoiDainik Gomantak
Published on
Updated on

लेगस्पिनर असणाऱ्या रवी बिश्नोईचे टीम इंडियामध्ये खेळण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात (India vs West Indies, 1st T20) हरियाणाचा हा लेगस्पिनर खेळताना दिसणार आहे. कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डन्सवर बिश्नोई आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. बिश्नोईची (Ravi Bishnoi) प्रथमच भारतीय संघात ( India v West Indies T20I Series) निवड झाली आहे. विशेष म्हणजे तो ODI संघाचा देखील एक भाग होता. पंरतु त्या फॉरमॅटमध्ये त्याला संधी मिळाली नव्हती. आता मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बिश्नोईला टी-20 मध्ये पदार्पण करत आहे. सामन्यापूर्वी लेगस्पिनर युजवेंद्र चहलने (Yujvendra Chahal) पदार्पणाची कॅप रवी बिश्नोईला दिली. बीसीसीआयने (BCCI) बिश्नोईच्या पदार्पणाचा व्हिडिओ देखील ट्विटरवर शेअर केला आहे. (Ravi Bishnoi Will Play His First T20 Match Against West Indies)

दरम्यान, रवी बिश्नोईने 2019 पासूनच डोमेस्टिक लीगमध्ये टी-20 सामने खेळायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे इतक्या कमी कालावधीत त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बिश्नोईने 42 टी-20 सामन्यात 49 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेटही थक्क करायला लावणार आहे. बिश्नोई प्रति षटक फक्त 6.63 धावा देतो.

Ravi Bishnoi
IPL 2022: श्रेयस अय्यर होणार कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार?

तसेच, रवी बिश्नोईने आयपीएलमध्ये (IPL) चमकदार कामगिरी करुन आपली क्षमता सिद्ध केली होती. बिश्नोईने 23 सामन्यात 24 विकेट घेतल्या होत्या. एवढ्या मोठ्या लीगमध्येही बिश्नोईचा इकॉनॉमी रेट फक्त 6.97 धावा प्रति षटक होता. भारताचे माजी दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळे यांच्या स्टाईलमध्ये बिश्नोई गोलंदाजी करतो. फलदाजांना चकवा देणारी गुगली देखील तो टाकतो. बिश्नोई मुख्यतः टॉप स्पिन आणि गुगली बॉल टाकतो. तसेच तो एका ओव्हरमध्ये फक्त 1-2 लेग स्पिन टाकतो.

Ravi Bishnoi
IPL 2021: कोलकाता नाईट रायडर्सचा फिरकीपटू कुलदीप यादव IPL मधून बाहेर

ईडन गार्डन्सवर भारताने नाणेफेक जिंकली

ईडन गार्डन्सवर झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने नाणेबाजी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र टीम इंडियाने श्रेयस अय्यरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले नाही. त्याचवेळी संघात दोन लेगस्पिनर्सची निवड करण्यात आली. युजवेंद्रसोबत रवी बिश्नोईलाही संधी मिळाली आहे.

भारताची प्लेइंग इलेव्हन - इशान किशन, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल.

वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन - ब्रॅंडन किंग, काइल मेयर्स, निकोलस पूरन, रोव्हमन पॉवेल, किरॉन पोलार्ड, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, अकिल हुसेन, ओडाइन स्मिथ, फॅबियन ऍलन, शेल्डर कॉट्रेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com