Badminton Tournament : करण, अंजना, हर्ष, जान्हवीचे घवघवीत यश

मानांकन बॅडमिंटन: रसिक स्मृती स्पर्धेत तेजन, निधी यांचीही चमक
Badminton Tournament
Badminton TournamentDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: रसिक स्मृती राज्य मानांकन बॅडमिंटन स्पर्धा नावेली येथे पार पडली. या स्पर्धेत पुरुष एकेरीत करण धावसकर याने, तर महिला एकेरीत अंजना कुमारी हिने विजेतेपद पटकावले. 19 वर्षांखालील ज्युनियर गटात हर्ष माने मुलांत, तर जान्हवी महाले मुलींत विजेती ठरली. याशिवाय तेजन फळारी व निधी देसाई यांनीही यशस्वी कामगिरी बजावली.

(Rasik Smriti State Ranking Badminton Tournament held at Manohar Parrikar Indoor Stadium navelim)

Badminton Tournament
Badminton Tournament : करण, अंजना, हर्ष, जान्हवीचे घवघवीत यश

रसिक मेमोरियल ट्रस्टने गोवा बॅडमिंटन असोसिएशन व गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने घेतलेली स्पर्धा नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये झाली.जान्हवी महाले तीन गटात विजेती ठरली, तर तेजन फळारी, अंजना कुमारी व निधी देसाई यांनी दोन गटात विजेतेपद मिळविले. सी. के. शाहीनला स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूचे बक्षीस मिळाले.

Badminton Tournament
Team India: या भारतीय महिला खेळाडूचे लुटले दागिने

बक्षीस वितरण नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक अजय गावडे, रसिक मेमोरियल ट्रस्टच्या विश्वस्त कमलिनी पैंगीणकर, तनुजा पैंगीणकर, राजू पैंगीणकर, अनिल पैंगीणकर, गोवा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष नरहर ठाकूर, सचिव संदीप हेबळे यांच्या उपस्थितीत होते

अंतिम निकाल

19 वर्षांखालील एकेरी :मुली: जान्हवी महाले वि. वि. निधी देसाई 21-18, 21-1. मुलगे :हर्ष माने वि. वि. निशांत शेणई 21-19, 14-21, 21-18.

19 वर्षांखालील दुहेरी :मुली:निधी देसाई-जान्हवी महाले वि. वि. प्रतिष्ठा शेणॉय-सिनोव्हिया डिसोझा 21-9, 21-7. मुलगे :यश देसाई-अश्मीत पार्सेकर वि. वि. यश हळर्णकर-आर्यमान सराफ 13-21, 21-18, 21-17. मिश्र दुहेरी :यश हळर्णकर-निधी देसाई वि. वि. आर्यमान सराफ-मिनोष्का परेरा 21-18, 18-21, 21-16

महिला एकेरी :अंजना कुमारी वि. वि. जान्हवी महाले 21-15, 21-23, 21-15. पुरुष एकेरी :करण धावसकर वि. वि. उमाकांत सर्गे 21-18, 21-19. महिला दुहेरी :जान्हवी महाले-अंजना कुमारी वि. वि. अनार सिंगबाळ-यास्मिन सय्यद 21-17, 11-21, 21-16. पुरुष दुहेरी :तेजन फळारी-अर्जुन फळारी वि. वि. सनत कामत-अर्जुन चौहान 21-16, 21-11. सीनियर मिश्र दुहेरी :तेजन फळारी-यास्मिन सय्यद वि. वि. अयान शेख-अनार सिंगबाळ 10-21, 21-13, 21-11.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com