Ranji Trophy : राजस्थानच्या फलंदाजांनी हिरावला गोव्याचा विजय; मोहित रेडकरच्या पदार्पणातच 5 विकेट

अनिर्णित लढतीत गोव्याला आघाडीचे तीन गुण
Ranji Trophy
Ranji TrophyDainik Gomantak
Published on
Updated on

Ranji Trophy : गोव्याचा ऑफस्पिनर मोहित रेडकर याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील पदार्पणाच्या डावात पाच गडी बाद करण्याचा पराक्रम साधला, पण राजस्थानचे शेपटाकडील फलंदाज यजमान गोलंदाजांना वरचढ ठरले. त्यामुळे त्यांना फॉलोऑन टाळता आला. चार दिवसीय सामना पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर झाला. अनिर्णित लढतीतून गोव्याला पहिल्या डावातील 91 धावांच्या आघाडीचे तीन गुण मिळाले, तर राजस्थानला एका गुणावर समाधान मानावे लागले. तरीही तळाच्या फलंदाजांची झुंजार कामगिरी राजस्थानला दिलासा देणारी ठरली.

Ranji Trophy
Portugal Football: रोनाल्डोला बेंचवर बसवणाऱ्या कोचचा राजीनामा; इमोशनल Video व्हायरल

गोव्याचा पुढील सामना येत्या मंगळवारपासून (ता. 20) जमशेदपूर येथे झारखंडविरुद्ध होईल, तर जयपूर येथे राजस्थान केरळविरुद्ध खेळेल. गोव्याने पहिला डाव गुरुवारी सकाळी 9 बाद 547 धावांवर घोषित केला होता. शुक्रवारी सामन्याच्या शेवटच्या दिवशी चहापानापूर्वी डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याने राजस्थानचा शेवटचा गडी अनिकेत चौधरी याला त्रिफळाचीत बाद करून त्यांचा डाव 456 धावांत संपविला. त्यानंतर दोन्ही कर्णधारांच्या सहमतीने पंचांनी सामना अनिर्णित घोषित केला. गोव्याचा फिरकी गोलंदाज मोहित रेडकर याने 113 धावांत 5, तर अर्जुन तेंडुलकरने 104 धावांत 3 गडी बाद केले. राजस्थानच्या मानव सुथार याला पायचीत बाद करून मोहितने रणजी क्रिकेट स्पर्धेतील पदार्पणात पाचवी विकेट प्राप्त केली. पहिल्या डावातील गोव्याचा द्विशतकवीर सुयश प्रभुदेसाई सामन्याचा मानकरी ठरला.

Ranji Trophy
Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टरचा 'रोमँटिक' अंदाज पाहिलाय का? पत्नीबरोबरचा Video तुफान व्हायरल

तळाच्या फलंदाजांची झुंज

गोव्याने गुरुवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी राजस्थानचा सहावा गडी बाद केला तेव्हा त्यांची 6 बाद 223 अशी स्थिती होती व फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना 175 धावांची गरज होती. अशावेळी प्रतिस्पर्ध्यांवर फॉलोऑन लादून सामना जिंकण्याचे गोव्याचे नियोजन होते. शुक्रवारी कालचा नाबाद कुणालसिंग राठोड (31) लवकर बाद झाला, त्यानंतर शुभम शर्मा (29), मानव सुथार (48) यांच्यासह अराफात व अनिकेत यांनी चिवट फलंदाजी करताना वेळप्रसंगी आक्रमकताही दाखविली. त्यामुळे राजस्थानला सामना सन्मानाने अनिर्णित राखता आला. मानव सुथार व अराफात खान यांनी नवव्या विकेटसाठी केलेली 60 धावांची भागीदारीही निर्णायक ठरली. फॉलोऑन टाळण्यासाठी 40 धावांची गरज असताना अराफात खान (नाबाद 80) व अनिकेत चौधरी (38) यांनी शेवटच्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी केली, त्यामुळे राजस्थानला पुन्हा फलंदाजीस उतरावे लागले नाही.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः 9 बाद 547 घोषित. अनिर्णित विरुद्ध राजस्थान, पहिला डाव (6 बाद 245 वरून) ः 133.1 षटकांत सर्वबाद 456 (कुणालसिंग राठोड 31, शुभम शर्मा 29, मानव सुथार 48, अराफात खान नाबाद 80, अनिकेत चौधरी 38, लक्षय गर्ग 21-4-62-0, अर्जुन तेंडुलकर 23.1-5-104-3, मोहित रेडकर 47-14-113-5, ऋत्विक नाईक 16-2-60-0, दर्शन मिसाळ 23-4-95-1, सिद्धेश लाड 3-0-13-0).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com