Ranji Trophy: गोवा आणि केरळ (Goa Vs Kerala) विरूद्ध सुरू असलेल्या रणजी सामन्यात गोव्याला जिंकण्याची संधी आहे. दुसऱ्या डावात केरळला केवळ 200 धावांत गुंडाळण्यात गोव्याचा संघ यशस्वी झाला. त्यानंतर गोव्याला विजयासाठी 156 धावांचे आव्हान मिळालेले आहे. केरळने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गोव्याच्या संघाने दोन बाद 68 धावांपर्यंत मजल मारली आहे. गोव्याला विजयासाठी 55 षटकात आता केवळ 87 धावांची गरज आहे.
संक्षिप्त धावफलक
केरळ पहिला डाव - 265 / 10
गोवा पहिला डाव - 311 / 10
केरळ दुसरा डाव - 200 / 10
गोवा दुसऱ्या डावाचा खेळ सुरू आहे - 23 षटकात दोन बळी 68 धावा
सध्या मैदानात ईशान गडेकर 24 धावांवर तर, स्नेहल कवठणकर सहा धावांवर खेळत आहे.
ईशान गडेकरचा पदार्पणात शतकी पराक्रम
गोव्याच्या ईशान गडेकरने पदार्पण संस्मरणीय ठरविताना 200 चेंडूंत सात चौकार व एका षटकाराच्या मदतीने 105 धावा केल्या. रणजी क्रिकेट पदार्पणात शतक नोंदविण्याचा पराक्रम साधला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.