Konkani Language: कन्नड, केरळ विद्यापीठात आता कोंकणी भाषेचे धडे

दोन्ही विद्यापीठांनी राज्यपालांचा प्रस्ताव मान्य केला असल्याचे पिल्लई म्हणाले.
Konkani Language
Konkani LanguageDainik Gomantak
Published on
Updated on

कर्नाटक येथील मंगळुरू आणि केरळ मधील कोची विद्यापीठात (universities of Cochin and Mangalore) आता कोंकणी भाषेचे धडे दिले जाणार आहेत. या दोन्ही विद्यापीठात कोंकणी भाषेची तोंडओळख करून देण्यासंबधित अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. अशी माहिती गोव्याचे राज्यपाल पी.एस श्रीधरन पिल्लई (Governor P S Shreedharan Pillai) यांनी दिली आहे. दोन्ही विद्यापीठांनी राज्यपालांचा प्रस्ताव मान्य केला असल्याचे पिल्लई म्हणाले.

Konkani Language
Mahadayi Water Dispute: तुमच्या ऐक्याच्या पायात कोणी घातल्या बेड्या? म्हादईप्रश्‍नी विरोधक विखुरले

कोंकणी ही एक भारतातील सुंदर अशी प्राचीन भाषा आहे. ही भाषा केवळ गोव्यात नव्हे तर, कर्नाटक आणि महाराष्ट्रात देखील बोलली जाते. तसेच, केरळ मधील जवळपास दोन लाख लोक कोंकणी भाषा बोलतात. गोवा विद्यापीठाचे कुलपती या नात्याने मी मंगळुरू आणि कोची विद्यापीठांना कोंकणी भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्याची विनंती केली आणि त्यांनी हा प्रस्ताव मान्य केला आहे. अशी माहिती राज्यपाल पिल्लई यांनी दिली आहे. कुडचडे (Curchorem) येथील एका शाळेत राज्यपाल बोलत होते.

Konkani Language
Mahadayi Water Dispute: तुमच्या ऐक्याच्या पायात कोणी घातल्या बेड्या? म्हादईप्रश्‍नी विरोधक विखुरले

राज्यपालांनी यावेळी झेव्हियर शिक्षण संस्थेचे राज्यात शिक्षण प्रसार करण्यासंबधित प्रयत्नांचे कौतुक केले. ख्रिस्ती मिशनरीजने शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले असल्याचे उद्गागार यावेळी राज्यपालांनी काढले. मिशनरीजने जवळपास 80 डिक्शनरी तयार केल्या आहेत. याशिवाय माझी मातृभाषा असलेल्या मल्याळी भाषेचे शब्दकोश देखील तयार केल्याचे राज्यपाल पिल्लई म्हणाले. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश काब्राल उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Vagator Beach Hostel Drug Racket
Sachin Tendulkar Flight Cricket Video
diksha parwadkar accident
Goa Crime
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com