मास्टर ब्लास्टरने मध्य प्रदेशातील 560 आदिवासी मुलांच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

सीहोर जिल्ह्यातील (Sehore District) 560 आदिवासी मुलांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी सचिनने उचलली आहे. मुलांच्या मदतीसाठी त्याने एका एनजीओशी (NGO) देखील भागीदारी केली आहे.
Sachin Tendulkar
Sachin TendulkarDainik Gomantak

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ज्याला क्रिकेटचा देव म्हटले जाते. 2013 मध्ये याच दिवशी सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सीहोर जिल्ह्यातील (Sehore District) 560 आदिवासी मुलांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी सचिनने उचलली आहे. मुलांच्या मदतीसाठी त्याने एका एनजीओशी (NGO) देखील भागीदारी केली आहे.

दरम्यान, सचिन तेंडुलकरने मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिहोर जिल्ह्यातील दुर्गम गावांमध्ये सेवा कॉटेज उभारण्यासाठी 'एनजीओ परिवार'सोबत भागीदारी केली आहे. यापैकी एका सेवा कुटीर सेवानियातला भेट देण्यासाठी सचिन तेंडुलकर मंगळवारी पोहोचला आहे. दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर इंदूरहून रस्त्याने देवास जिल्ह्यातील खाटेगाव येथील संदलपूर गावात पोहोचला. जिथे तो एका NGO च्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. इथे सचिन तेंडुलकरने आपल्या वडिलांची आठवण करुन दिली आणि वडिलांना मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. आज ते आपल्यासोबत असण्याचा खूप आनंद झाला असता. (NGO) ही संस्था परिवार एज्युकेशन मुलांच्या शिक्षणासाठी काम करते. सचिन मुलांना त्यांच्या अभ्यासात मदत करत आहे. सचिननेही टीमसोबत इमारतीला भेट दिली. हा दौरा अतिशय गुप्त होता, परंतु सकाळी देवासच्या रस्त्यावरुन त्याचा ताफा गेल्यावर सचिनला लोकांनी ओळखले. छपरा ते बागली, पुंजापुरा असा हा ताफा खाटेगावातील संदलपूर येथे पोहोचला. यादरम्यान सचिन तिकडे गेला. लोकांनी हातात तिरंगा घेऊन त्याचे स्वागत केले. वाटेत अनेकांनी त्याच्या गाडीवर फुलांचा वर्षाव केला. कारच्या मागच्या सीटवर सचिन पांढऱ्या शर्टमध्ये बसला होता. सचिनने अनेक ठिकाणी हस्तांदोलन करुन लोकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. अनेकांनी आवाज देत सचिनला थांबण्याचीही विनंती केली. हातात तिरंगा घेतलेल्या लोकांनी भारत मातेच्या घोषणाही दिल्या. सचिनसोबत परदेशी खेळाडूंचा संघही होता. यादरम्यान सचिनसोबत आलेल्या टीमनेही शूटींगही केली. सचिनच्या दौऱ्यासाठी सुरक्षा व्यवस्थाही चोख करण्यात आली होती.

Sachin Tendulkar
घड्याळांच्या टॅक्स चोरीबाबत हार्दिकचे स्पष्टीकरण,'मी स्वत: शुल्कभरण्यासाठी गेलो'

शिवाय, येथील मुलांची भेट घेऊन त्यांची प्रकृती जाणून घेऊन त्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. तेंडुलकरसाठीही आजचा दिवस खास असल्याचेही सांगितले जात आहे. कारण या दिवशी सचिन तेंडुलकरने 2013 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सिहोर जिल्ह्यातील सेवानिया, बीलपाटी, खापा, नयापुरा आणि जामुन तलाव या गावांतील मुलांना आता तेंडुलकर फाऊंडेशनच्या मदतीने पोषण आहार आणि शिक्षण मिळत आहे. त्यापैकी बहुतांश माध्यमिक शाळेतील विद्यार्थी आहेत. मुले प्रामुख्याने बारेला भील आणि गोंड जमातीतील आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com