'संघात स्थान मिळवायचे असेल तर, खेळाडूंना घरेलू क्रिकेट खेळावेच लागेल': राहुल द्रविड

राहुल द्रविडने (Rahul Dravid) देशांतर्गत क्रिकेट खेळण्याबाबत आपले मत अगदी स्पष्ट मांडले आहे, खासकरून जे खेळाडू कसोटी क्रिकेट खेळतात त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे.
तंदुरुस्ती आणि खराब फॉर्ममुळे संघाबाहेर असलेल्या खेळाडूंनी निवडीपूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केले पाहिजे, असे द्रविडचे (Rahul Dravid) मत आहे. हा ते नियम सुरू करणार आहेत.
तंदुरुस्ती आणि खराब फॉर्ममुळे संघाबाहेर असलेल्या खेळाडूंनी निवडीपूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केले पाहिजे, असे द्रविडचे (Rahul Dravid) मत आहे. हा ते नियम सुरू करणार आहेत.Dainik Gomantak

भारताच्या (Team India) माजी खेळाडूंनी नवीन खेळाडूंना पदार्पण कॅप्स सोपवण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू केल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड (Coach Rahul Dravid) यांनी आणखी एक पाऊल उचलले आहे. त्यांनी माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे (Anil Kumble) काळातील आणखी एक धोरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तंदुरुस्ती आणि खराब फॉर्ममुळे संघाबाहेर असलेल्या खेळाडूंनी निवडीपूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये (Cricket) स्वत:ला सिद्ध केले पाहिजे, असे द्रविडचे मत आहे. हा ते नियम सुरू करणार आहेत. रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात हा नियम शिथिल करण्यात आला होता. परंतू द्रविडने तो पुन्हा सुरु केला आहे.

तंदुरुस्ती आणि खराब फॉर्ममुळे संघाबाहेर असलेल्या खेळाडूंनी निवडीपूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केले पाहिजे, असे द्रविडचे (Rahul Dravid) मत आहे. हा ते नियम सुरू करणार आहेत.
IND vs NZ: पावसामुळे राहुल सरांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाचा इनडोअर सराव

हार्दिक पंड्याच्या दुखापतीच्या बाबतीत संघ व्यवस्थापन आणि निवड समितीकडून अनेक चुका झाल्या होत्या. द्रविडला याची पुनरावृत्ती करायची नाही. अनिल कुंबळेच्या काळात बीसीसीआय आणि निवड समितीकडून स्पष्ट फर्मान होते, 'घरच्या मैदानावर खेळून, स्वत:ला सिद्ध करा आणि परत भारतीय संघात स्थान मिळवा'. पण आता त्यात बदल झाला. याबाबत बोलताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमाला सांगितले की, राहुल द्रविडने देशांतर्गत क्रिकेट खेळण्याबाबत आपले मत अगदी स्पष्ट मांडले आहे, खासकरून जे खेळाडू कसोटी क्रिकेट खेळतात त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे धोरण नेहमीच लागू होते परंतु गेल्या काही वर्षांत त्याचे काटेकोरपणे पालन केले जात नव्हते. राहुल द्रविडने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मल्टी फॉरमॅटच्या खेळाडूंशिवाय इतर खेळाडूंना खेळणे अनिवार्य केले आहे. हे खूप सोपे आहे, जर तुम्हाला दुखापत होऊन त्यातून तुम्ही तंदुरुस्त झालात तर तुम्ही तंदुरुस्त आहात हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला देशांतर्गत खेळावेच लागेल.

  • आयपीएलमधील कामगिरी हा अलीकडच्या काळात निवड निकषांपैकी एक आहे, द्रविडला तो बदलायचा आहे. कसोटी निवडीसाठी आयपीएलची कामगिरी लक्षात घेतली जाऊ शकत नाही.

  • हार्दिक पांड्याच्या दुखापतीला सर्वांनी पाहिले आहे, बीसीसीआय त्यावर नाराज आहे.

  • दुखापतीनंतर संघात परतणारे सर्व खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची खात्री द्रविडला करायची आहे.

  • हार्दिकला पुनरागमन करायचे असेल तर त्याला रणजी ट्रॉफीमध्ये खेळावेच लागेल. हार्दिकने या आधीच विजय हजारे ट्रॉफीमधून माघार घेतली आहे.

  • हार्दिक विजय हजारे ट्रॉफीमध्ये नसल्यामुळे तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी वनडे संघात निवडीला पात्र ठरणार नाही.

तंदुरुस्ती आणि खराब फॉर्ममुळे संघाबाहेर असलेल्या खेळाडूंनी निवडीपूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केले पाहिजे, असे द्रविडचे (Rahul Dravid) मत आहे. हा ते नियम सुरू करणार आहेत.
मुलामुळे राहुल द्रविड बनला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक!

हार्दिक पांड्याच्या निवडीवरून झालेल्या वादानंतर राहुल द्रविडने हे धोरण सुरू केले असल्याचे समोर येत आहे. हार्दिकला आयपीएल दरम्यान दुखापत झाली होती. तेथून तो थेट भारतीय संघात आला. टी-20 विश्वचषका दरम्यान त्याची कामगिरी निराशाजनक होती. यानंतर तो न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतून बाहेर पडला.

याशिवाय श्रेयस अय्यरच्या देखील खांद्यावर शस्त्रक्रिया झाली परंतू तो देखील पुनरागमना आधी घरच्या मैदानावर कोणताही घरगुती सामना न खेळता संघात परतला. T20 विश्वचषकासाठी भारताच्या राखीव खेळाडूंमध्ये देखील तो होता. पण आता त्यात बदल अपेक्षित आहे. हर्दिक पांड्यावर सध्या मुंबईत उपचार सुरू आहे. परंतू आता त्याला भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी त्याला 13 जानेवारी ते 20 मार्च दरम्यान होणाऱ्या रणजी ट्रॉफीमध्ये खेळावे लागेल.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बोलताना सांगितले, एखाद्याला सिस्टम समजून घेणे आवश्यक आहे. आमच्याकडे जागतिक दर्जाची देशांतर्गत पायाभूत सुविधा आहे. रणजीमध्ये किंवा विजय हजारे करंडकात खेळाडूंना त्यांची क्षमता तपासण्यात काहीही गैर नाही. त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वासही वाढेल. हार्दिकचा आत्मविश्वास कमी झाला आहे. अष्टपैलू म्हणून पुनरागमन करण्यापूर्वी त्याला आपण पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सिद्ध करावे लागेल. त्याला एनसीएमध्ये येऊन रणजी ट्रॉफीमध्येही खेळायवे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com