Sameer Amunekar
भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू आणि जागतिक क्रिकेटमध्ये 'द वॉल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आज आपला 52 वा वाढदिवस साजरा करत आहे.
राहुल द्रविडनं कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 164 सामने खेळले आहेत, ज्यात त्यानं 286 डावांमध्ये फलंदाजी करताना 52.31 च्या सरासरीनं 13288 धावा केल्या आहेत.
द्रविडच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 36 शतकं आणि 63 अर्धशतकं आहेत. द्रविडनं कसोटी सामन्यात 5 द्विशतकंही झळकावली आहेत.
राहुल द्रविडच्या वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्यानं 344 सामने खेळले आहेत, ज्यात त्यानं 318 डावांमध्ये फलंदाजी करताना 39.17 च्या सरासरीनं 10889 धावा केल्या आहेत. राहुल द्रविडने वनडेत 12 शतकं आणि 83 अर्धशतकं आहेत.
राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले, हा भारतासाठी ऐतिहासिक विजय होता. त्याने 2006 च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात भारताला 35 वर्षांनंतर मालिका विजय मिळवून दिला.
2024 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकासह राहुल द्रविडनं भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून आपला कार्यकाळ संपवला, जो भारताला जिंकण्यात यशस्वी झाला.