ऋषभ पंतच्या शतकावर राहुल द्रविड बनला 'बाहुबली', VIDEO

पंतने 111 चेंडूत 146 धावांची खेळी खेळली आहे.
Rishabh Pant
Rishabh PantDainik Gomantak

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 व्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंतने (Rishabh Pant) एजबॅस्टन येथे 'वन मॅन शो' सादर केला म्हणायला हरकत नाही. पंतने 111 चेंडूत 146 धावांची खेळी खेळली आहे. पहिल्या दिवशी पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच फटकेबाजी केली. त्याने आपल्या खेळीत 20 चौकार आणि चार सिक्सर मारले. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण जसजशी संध्याकाळ होत गेली तसतसे चित्र बदलले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने अवघ्या 73 षटकांत 7 गडी गमावून 338 धावा केल्या. रवींद्र जडेजा 85 धावांवर नाबाद झाला. (Rahul Dravid became Baahubali on Rishabh Pant century VIDEO)

Rishabh Pant
एफसी गोवा संघात सीरियन बचावपटू

ऋषभ पंतने प्रत्येक मालिकेतील शेवटच्या सामन्यात शतक झळकावले

पंतने चार वर्षांपूर्वी इंग्लंड दौऱ्यावर ओव्हलच्या मैदानावर पहिले कसोटी शतक झळकावले होते. त्याने आत्तापर्यंत पाच शतके झळकावली असून त्यापैकी 4 विदेशी मैदानावर झळकावली. पंतने सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 159*, अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध 101, दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर या वर्षी नाबाद 100 आणि नंतर एजबॅस्टन येथे 146 धावा केल्या आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मालिकेतील शेवटच्या सामन्यात पंतने सर्व शतके झळकावली आहेत. पंत आता निर्णायक सामन्यांमध्ये मोठी खेळी खेळत आहे तर याशिवाय, तो कसोटी क्रिकेटमध्ये असा फलंदाज बनण्याच्या तयारीत आहे जो कधीही फासे उलटवू शकतो.

पंतच्या शतकावर राहुल द्रविडने खास शैलीत साजरे केले

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ 2-1 ने सध्या पुढे आहे. मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाला ही कसोटी फक्त ड्रॉ करायची आहे. भारताने अखेरची कसोटी मालिका 2007 मध्ये इंग्लंडच्या भूमीवर 1-0 अशी जिंकली होती तर राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाची कमान सांभाळत आहे. आता द्रविड प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे.

एकावेळी पाच विकेट्स गमावल्याने टीम इंडिया अडचणीत दिसून आली होती. त्यानंतर पंत आणि जडेजाने 239 चेंडूत 222 धावांची भागीदारी करून राहूल द्रविडची चिंता दूर केली. पंतच्या शतकानंतर राहुल द्रविडने आक्रमक पद्धतीने सेलिब्रेशन केले, ड्रेसिंग रूममध्ये सहकारी खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com