Rafael Nadal: वर्षभराने कमबॅक केलेला नदाल ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर! स्वत:च पोस्ट करत दिली अपडेट

Australian Open 2024: राफेल नदाल आगामी ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर झाला असून यामागील कारण त्यानेच स्पष्ट केले आहे.
Rafael Nadal
Rafael NadalX/BrisbaneTennis
Published on
Updated on

Rafael Nadal withdrawn from the Australian Open 2024:

स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालने काही दिवसांपूर्वीच टेनिस कोर्टवर पुनरागमन केले होते. तसेच तो यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपनीही खेळणार असल्याचे त्याने म्हटले होते. मात्र, आता तो ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेतून बाहेर झाला आहे. याबद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.

नदालने माहिती दिली आहे की त्याच्या स्नायूंमध्ये दुखापत झाली आहे. त्याचमुळे त्याला 14 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनमधून माघार घ्यावी लागली आहे.

नदालला ब्रिस्बेन इंटरनॅशनल 2024 स्पर्धेत उपांत्यपूर्व सामना खेळताना माकडहाडाच्या स्नायूंमध्ये समस्या जाणवली होती.

Rafael Nadal
Rafael Nadal: नदाल इज बॅक! 349 दिवसांनी खेळलेल्या पहिल्याच एकेरी सामन्यात रोमहर्षक विजय

याबद्दल नदालने लिहिले की 'ब्रिस्बेनमध्ये माझ्या अखेरच्या सामन्यादरम्यान माझ्या स्नायूमध्ये समस्या जाणवली होती, तुम्हाला माहित आहे, त्यामुळे मी चिंतेत होतो. मी मेलबर्नला आल्यानंतर मला एमआरआय करण्याची संधी मिळाली, त्यात स्नायूं थोडे ताणल्याचे दिसले.'

'मला यापूर्वी जिथे दुखापत झाली होती, तिथेच ही दुखापत झालेली नाही, जी चांगली गोष्ट आहे. सध्या मी पाच सेटच्या सामन्यात उच्च स्थरावर स्पर्धा करण्यास तयार नाही. मी पुन्हा स्पेनला जात आहे, तिथे माझ्या डॉक्टरांची भेट घेईल आणि उरचार घेऊन थोडी विश्रांती घेईल.'

Rafael Nadal
Rafael Nadal: तो परत येतोय! लाल मातीच्या बादशाहने केली कमबॅकची घोषणा

नदालने पुढे लिहिले की 'मी हे पुनरागमन करण्यासाठी वर्षभर खूप मेहनत केली होती. मी आधी म्हटल्याप्रमाणे माझे ध्येय तीन महिन्यांत माझ्या सर्वोत्तम स्तरावर असण्याचे आहे. माझ्यासाठी ही वाईट बातमी आहे की मी मेलबर्नच्या शानदार प्रेक्षकांसमोर खेळू शकणार नाही. पण ही इतकी वाईट बातमी नाही कारण आम्ही या हंगामात पुढे जाण्यासाठी सकारात्मक आहोत.'

'मला ऑस्ट्रेलियामध्ये खेळायचे होते आणि मला काही सामने खेळण्याची संधी मिळाली, ज्यामुळे मी आनंदी आणि सकारात्मक आहे. तुमच्या पाठिंब्यासाठी आभार आणि लवकरच भेटू.'

राफेल नदालला दुखापतीमुळे जवळपास गेले एक वर्ष टेनिसपासून दूर रहावे लागले होते. त्याला शस्त्रक्रियेलाही सामोरे जावे लागले होते. त्याने गेल्यावर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपननंतर एक वर्षाने ब्रिस्बेन इंटरनॅशनल 2024 स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पुनरागमन केले होते.

या स्पर्धेत तो उपांत्यपूर्व फेरीपर्यंतही पोहचला. मात्र, त्याला उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉम्पसनने 3 तास 25 मिनिटे चाललेल्या सामन्यात 5-7, 7-6 (8/6), 6-3 असे पराभूत केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com