IPL 2024 Players Auction, Rachin Ravindra in CSK:
इंडियन प्रीमीयर लीग 2024 स्पर्धेसाठी मंगळवारी (19 डिसेंबर) लिलाव होत आहे. हा लिलाव दुबईतील कोका-कोला एरिनामध्ये होत आहे. या लिलावत अनेक मोठी नावे चर्चेत असून यातील एक नाव म्हणजे न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रविंद्र.
दरम्यान, रचिन रविंद्रसाठी अनेक संघांनी बोली लावली, मात्र त्याची बोली एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाने जिंकली. चेन्नईने त्याला 1.80 कोटी रुपयांमध्ये खरेदी करत संघात सामील करून घेतले.
रचिनने वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सर्वांना प्रभावित केले होते. त्याने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये 3 शतकांसह 64.22 च्या सरासरीने 578 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला मोठी बोली लागण्याची शक्यता अनेकांनी लावली होती. त्याची 50 लाख ही मुळ किंमत होती.
भारतीय वंशाचा असलेल्या रचिनचा हा पहिलाच आयपीएल हंगाम असणार आहे. त्याने आयपीएलमध्ये यापूर्वी सहभाग घेतलेला नाही. त्यामुळे जर त्याला खेळण्याची संधी मिळाली, तर तो आयपीएलमध्ये चेन्नईकडून पदार्पण करेल.
दरम्यान, चेन्नई संघात त्याच्या ओळखीचे काह चेहेरेही आहेत. चेन्नईमध्ये रचिनचे न्यूझीलंड संघातील संघसहकारी डेव्हॉन कॉनवे आणि मिचेल सँटनर संघात आहेत. त्यामुळे त्यांना आता रचिनही सामील होणार आहे.
रचिनने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत 52 टी20 सामने खेळले आहेत. या 53 टी20 सामन्यांत फलंदाजी करताना त्याने 618 धावा केल्या आहेत, तर गोलंदाजी करताना 41 विकेट्स घेतल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.