R Sai Kishore: देशाकडून खेळण्याचा आनंदच निराळा! राष्ट्रगीतावेळी साई किशोरच्या डोळ्यात तरळले अश्रू

Asian Games: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताकडून पदार्पण करणाऱ्या आर साई किशोरला राष्ट्रगीतावेळी अश्रू अनावर झाले होते.
R Sai Kishore | Asian Games
R Sai Kishore | Asian GamesTwitter
Published on
Updated on

R Sai Kishore gets Emotional during National Anthem ahead of India vs Nepal 19th Asian Games Quarter Final Match:

आशियाई क्रीडा स्पर्धेत यंदा क्रिकेटचाही समावेश असून भारताचा पुरुष संघही सहभागी झाला आहे. भारतीय संघाचा पहिला सामना उपांत्यपूर्व फेरीत नेपाळविरुद्ध मंगळवारी (3 ऑक्टोबर) झाला. दरम्यान, या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी भारताचा क्रिकेटपटू आर साई किशोर भावूक झालेला दिसला.

झाले असे की या सामन्यातून भारताकडून आर साई किशोर आणि जितेश शर्मा यांचे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण झाले.

त्यांना पदार्पणाची संधी मिळाल्यानंतर जेव्हा भारत आणि नेपाळ संघ सामन्याला सुरुवात होण्यासाठी आपापल्या देशाच्या राष्ट्रगीतासाठी मैदानावर उभे होते, त्यावेळी साई किशोर भावूक झालेला दिसला. त्याच्या डोळ्यात पाणीही तरळल्याचे दिसून आले. या क्षणांचा फोटो आणि व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहेत.

R Sai Kishore | Asian Games
Asian Games 2023: शेतकऱ्याच्या पोरीची चमकदार कामगिरी, पारुल-प्रीतीने भारतासाठी जिंकले पदक

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास हा भारतीय पुरुष संघाचा आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिलाच सामना ठरला. या सामन्यात भारताचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानंतर या निर्णयाचा फायदा घेत यशस्वी जयस्वालने आक्रमक खेळताना शतक केले. त्याला ऋतुराजने संयमी साथ देत 25 धावांची खेळी केली. तसेच जयस्वाल आणि ऋतुराज यांनी सलामीला 103 धावांची भागीदारी केली. दरम्यान, जयस्वाल 49 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांसह 100 धावांची खेळी केली.

तसेच अखेरीस शिवम दुबे आणि रिंकू सिंग यांनी आक्रमक खेळ करत भारताला 20 षटकात 4 बाद 202 धावांपर्यंत पोहचवले. शिवम दुबेने 19 चेंडूत 25 धावा केल्या, तर रिंकूने 15 चेंडूत नाबाद 37 धावा फटकावल्या. नेपाळकडून दिपेंद्र सिंगने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

R Sai Kishore | Asian Games
Yashasvi Jaiswal ने रचला इतिहास, Asian Games मध्ये शतक झळकावणारा ठरला पहिला भारतीय

त्यानंतर 203 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळला 20 षटकात 9 बाद 179 धावाच करता आल्या. नेपाळकडून दिपेंद्र सिंगने 32 धावांची खेळी केली. तसेच संदीप जोरा आणि कुशल मल्ला यांनी 29 धावा केल्या, तर कुशल भुर्टेलने 28 धावा केल्या. बाकी कोणाला खास काही करता आले नाही.

भारताकडून अवेश खान आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच अर्शदीप सिंगने 2 विकेट्स घेतल्या, तर आर साई किशोरने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com