IND vs WI, 1st Test: ठरलं तर! जयस्वाल गिलच्या जागेवर रोहितबरोबर करणार ओपनिंग, तिसऱ्या क्रमांकावर...

भारतीय संघाकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून यशस्वी जयस्वाल पदार्पण करणार असल्याचे रोहित शर्माने स्पष्ट केले आहे.
Yashasvi Jaiswal
Yashasvi JaiswalDainik Gomantak
Published on
Updated on

India vs West Indies 1st Test, Rohit Sharma Confirm Yashasvi Jaiswal will open: भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ कसोटी, टी20 आणि वनडे अशा तिन्ही क्रिकेट प्रकारातील मालिका वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार आहे. 12 जुलैपासून या दौऱ्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होईल.

भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना 12 जुलैपासून डॉमिनिकामधील रोसौ येथी विंडसर पार्कमध्ये खेळणार आहे. या सामन्यातून भारताकडून यशस्वी जयस्वाल पदार्पण करणार असल्याचे निश्चित झाले आहे. याबद्दल खुद्द भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने माहिती दिली आहे.

रोहितने पहिल्या कसोटीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत असेही संकेत दिले की डावखुरा फलंदाज असलेला जयस्वाल शुभमन गिलच्या ऐवजी त्याच्याबरोबर सलामीला फलंदाजी करेल. तसेच शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.

Yashasvi Jaiswal
IND vs WI, T20I Squad: रिंकू सिंग ते ऋतुराज, आयपीएलमधील 'या' 5 सुपरस्टारकडे दुर्लक्ष? चाहत्यांमध्येही नाराजी

रोहितने सांगितले, 'भारतीय संघ डावखुऱ्या फलंदाजाच्या खूप शोधात होता आणि आता जयस्वालमध्ये तो फलंदाज आम्हाला मिळाला आहे. वरच्या फळीत उजवे-डावे संमिश्रण नक्कीच आमच्यासाठी फायदेशीर आहे.'

'गिल स्वत: मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडकडे गेला आणि त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची इच्छा व्यक्त केली. कारण त्याने त्याच्या कारकिर्दीत याच क्रमांकावर सर्वाधिक फलंदाजी केली आहे.'

याशिवाय रोहितने गोलंदाजांच्या दुखापतीबद्दल चिंता व्यत्त केली आहे. सध्या जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त आहे, तर मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. अशात मोहम्मद सिराजवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत वेगवान गोलंदाजीची धूरा सांभाळण्याची जबाबदारी असणार आहे.

Yashasvi Jaiswal
IND vs WI: WTC फायनलमध्ये सलग दोन पराभव विसरत भारताची तिसऱ्या पर्वाला सुरुवात! केव्हा अन् कुठे पाहाल पहिली मॅच

रोहित गोलंदाजांबद्दल म्हणाला, 'खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या आहेत. त्यामुळे आम्ही तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटू अशा मिश्रणासह मैदानात उतरणार आहोत.'

'दुर्दैवाने, आमच्याकडे सध्या वेगवान गोलंदाजांची लाईन लागलेली नाही. अनेक जण दुखापतीचा सामना करत आहेत. त्याचमुळे आमचे काही अनुभवी गोलंदाज या दौऱ्यावर येऊ शकले नाहीत. भारतीय क्रिकेटसमोर हे नेहमीच आव्हान असेल. कारण आम्ही खूप खेळतो. आम्हाला खेळाडूंना विश्रांती देण्याची त्यांना मॅनेज करण्याची गरज आहे, ज्यामुळे ते ताजेतवाने होऊन पुनरागमन करतील.'

'आम्ही केवळ एका मालिकेवर लक्ष केंद्रित करण्याची चैन करू शकत नाही. आम्हाला भविष्याचाही विचार करावा लागतो. वर्ल्डकप येत आहे आणि आम्हाला पाहावे लागेल की त्या स्पर्धेसाठी आम्हाला कोणत्या खेळाडूंची गरज आहे.'

पहिल्या कसोटीसाठी अशी असू शकते भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com