R Ashwin: '...म्हणून तिलक वर्माने खेळायला हवा वर्ल्डकप', अश्विनने कारणासहीत दिलं स्पष्टीकरण

Tilak Varma: आर अश्विनने आगामी वर्ल्डकप 2023 साठी चांगला पर्याय असल्याचे सांगताना त्यामागीत ठोस कारणही स्पष्ट केले आहे.
R Ashwin | Tilak Varma
R Ashwin | Tilak VarmaDainik Gomantak
Published on
Updated on

R Ashwin on Tilak Varma as a Option for Team India in ICC ODI Cricket World Cup 2023:

भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात संघ टी२० मालिका खेळत असून याच मालिकेतून 20 वर्षीय फलंदाज तिलक वर्माने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

त्याने पदार्पण केल्यानंतर पहिल्या दोनच सामन्यात आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवत अनेकांना प्रभावित केले आहे, ज्यात भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनचाही समावेश आहे.

आर अश्विनने डावखुरा फलंदाज असलेल्या तिलकचे कौतुक केले असून तो आगामी वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी चांगला पर्याय असल्याचे म्हटले आहे. त्यामागील कारणही त्याने स्पष्ट केले आहे.

तिलकने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातून पदार्पण करताना फलंदाजीला उतरल्यानंतर लगेचच दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग षटकार मारत सुरुवात केली होती.

त्या सामन्यात त्याने 22 चेंडूत 39 धावा केल्या, तसेच त्याने दुसऱ्या सामन्याच 41 चेंडूत 51 धावांची खेळी केली होती. दोन्ही सामन्यात तो भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.

R Ashwin | Tilak Varma
R Ashwin Records: अश्विनची मोठी झेप! विंडिजविरुद्ध 12 विकेट्स घेत भल्याभल्या दिग्गजांना टाकलं मागे

त्याच्याबद्दल आर अश्विनने त्याच्या एका युट्युब व्हिडिओमध्ये म्हटले की 'वर्ल्डकप स्पर्धेसाठी जर पुरेसे बॅकअप पर्याय नसतील, तर ते तिलक वर्माचा एक पर्याय म्हणून विचार करत आहेत का? कारण संजू सॅमसनने वनडेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण तिलकबाबत चांगली गोष्ट म्हणजे तो डावखुरा आहे आणि भारतीय संघाला डावखुऱ्या खेळाडूंची कमी जाणवत आहे.'

'भारताच्या पहिल्या 7 फलंदाजांमध्ये केवळ जडेजा एकमेव डावखुरा फलंदाज आहे. जर तुम्ही सध्याच्या अव्वल संघांतील ऑफ-स्पिनर्सकडे नजर टाकली, तर लक्षात येईल. ऑस्ट्रेलियाकडे ऍश्टन एगार आहे, इंग्लंडकडे मोईन आली आणि लेग स्पिनर आदील राशिद आहे.'

'त्यामुळे बऱ्याच संघांकडे बोटाचे चेंडू वळवणारे फिरकीपटू नाहीत, जे डावखुऱ्या फलंदाजांसमोर आव्हान ठेवू शकतात. त्याचमुळे तिलक वर्माचा उदय महत्त्वाचा आहे. तरी अजून कदाचीत हे खूप घाईचे होत असेल, पण ते त्याला पर्याय म्हणून पाहात आहेत का, हा प्रश्न आहे.

'त्याने कमीत कमी सर्वांचे लक्ष वेधले आहे. तो नक्कीच भविष्यातील योजनेत असेल. कारण कोणत्याही निवडकर्त्याने जर त्याची ती खेळी पाहिली असेल, तर तो 'वाह' असेच म्हणेल.'

R Ashwin | Tilak Varma
Tilak Varma and Samaira: रोहितच्या लेकीसाठी तिलक वर्माचं स्पेशल सेलिब्रेशन, कारण...

याशिवाय अश्विनने असेही म्हटले आहे की तिलक वर्माची फलंदाजी शैली काहीशी रोहित शर्मासारखी आहे.

अश्विन म्हणाला, 'त्याची फलंदाजी शैली एखाद्या भारतीयाने आंतरराष्ट्रीय पदार्पणावेळी करावी तशी नव्हती. त्याचा खेळ बराचसा रोहित शर्मासारखा आहे. तो पुल शॉटवर घाम काढू शकतो. साधारत: भारतीय फलंदाज पुल शॉट खेळण्यासाठी सज्ज होत नाहीत, ही गोष्ट ते नंतर विकसित करतात.'

'पण त्याचा खेळ असा आहे की असे वाटते त्याच्याकडे नैसर्गिकरित्या पुल शॉट आहे आणि तो ऑस्ट्रेलियन फलंदाजासारखा चेंडू सीमापार करू शकतो. त्याच्याबाबत हे खूप लवकर होत असेल, पण त्याने केलेली खेळी शानदार होती.'

रोहित आणि तिलक हे दोघेही मुंबई इंडियन्सकडून एकत्र आयपीएलही खेळतात. दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की तिलकची चीनमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या एशियन गेम्स स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.'

'त्यामुळे त्याची वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी निवड होण्याची शक्यता कमी आहे. कारण बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की या दोन्ही स्पर्धांच्या तारखा क्लॅश होत असल्याने दोन्ही स्पर्धेत पूर्ण वेगळे दोन संघ खेळणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com