पी.व्ही. सिंधू ‘तेरी आंख्या का यो काजल’ गाण्यावर थिरकली; सोशल मिडियावर डान्स व्हायरल

त्या गाण्यासह बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक गाण्यावर तिने डान्स केला.
P.V. Sindhu
P.V. Sindhu Dainik Gomantak
Published on
Updated on

भारताची प्रसिध्द बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने (P.V. Sindhu) सुचित्रा अकादमीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात थिरकताना दिसून आली आहे. काही दिवसांपूर्वीच सिंधू टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून भारतात परतली. 'तेरी ऑंख्या का यो काजल' या सपना चौधरीच्या (Sapna Chowdhury) प्रसिध्द गाण्यावर सिंधूने जोरदार डान्स केला. त्या गाण्यासह बॉलिवूडमधील अनेक गाण्यावर तिने डान्स केला. त्याचबरोबर सिंधू यावेळी एकदम स्टायलिश लूकमध्ये दिसून आली. सिंधूच्या या डान्सने आयोजित केलेल्या पार्टीला चार चांद लागले.

सिंधूने टोकियो ऑलिम्पिमध्ये (Tokyo Olympics) भारताला कांस्य पदक मिळवून दिले. सिंधूच्या मेहनतीबरोबरच तिच्या टीमने तिच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. आणि सिंधूने त्याच टीमधील आपल्या सहकार्यांसाठी पार्टी आयोजित केली होती. त्याचबरोबर सिंधूने आकादमीच्या इतर खेळांडूसोबत डान्स करताना यावेळी पाहायला मिळाली. या आयोजित कार्यक्रमात तिने बॉलिवूडमधील गाण्यासंह दक्षिणात्य गाण्यांवरही हटके डान्स केला. यावेळी तिने हरियाणाची प्रसिध्द डान्सर सपना चौधरीच्या गाण्यावरही थिरकताना दिसली.

P.V. Sindhu
WWE SummerSlam मध्ये सर्वाधिक सामने लढणारे 4 सुपरस्टार

सिंधूने रचला इतिहास

टोकियो ऑलिम्पिकमध्ये कास्यंपदक जिंकत सिंधूने इतिहास रचला. पी. व्ही सिंधू सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी खेळाडू ठरली आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पहिल्या सामन्यापासून शानदार प्रदर्शन करण्यास सुरुवात केली. परंतु उपांत्य फेरीमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर सिंधूचे गोल्ड मिडेल जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र 1ऑगस्ट रोजी सिंधूने कास्यंपदकाच्या लढतीमध्ये विजय संपादन केला. सिंधूने याआगोदर रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती.

P.V. Sindhu
IPL 2021: बीसीसीआयचा मोठा निर्णय; UAE मध्ये होणार 31 सामने

सिंधूची कारकिर्द

2009 मध्ये कोलंबोमध्ये सब-ज्यूनिअर आशियाई बॅडमिटंन स्पर्धेमध्ये कास्यपदकावर आपले नाव कोरले होते. तर दुसरीकडे 2010 मध्ये इराण फजर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंजमध्ये सिंधूने रौप्यपदक आपल्या नावावर केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com