WWE SummerSlam मध्ये सर्वाधिक सामने लढणारे 4 सुपरस्टार

WWE SummerSlamच्या 33 वर्षांच्या इतिहासात, शेकडो कुस्तीपटूंनी या पेपर व्ह्यूमध्ये आपले पराक्रम दाखवून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे.
WWE SummerSlam
WWE SummerSlamDainik Gomantak
Published on
Updated on

(WWE SummerSlam) समरस्लॅम WWEच्या वर्षातील सर्वात जुने आणि टॉप 04 पेपर व्ह्यू इव्हेंट्सपैकी एक आहे. पहिला समरस्लॅम 29ऑगस्ट 1988 रोजी न्यूयॉर्क शहरातील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झाला होता. 1988 मध्ये स्थापना झाल्यापासून 33 वेळा हा इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे आणि आता 34 वा इव्हेंट सुद्धा येणाऱ्या काळात लवकरच आयोजित केली जाईल.

डब्ल्यूडब्ल्यूई समरस्लॅमच्या 33 वर्षांच्या इतिहासात, शेकडो कुस्तीपटूंनी या पेपर व्ह्यूमध्ये आपले पराक्रम दाखवून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. समरस्लॅमचा इतिहास जवळजवळ 34 वर्षांचा असल्याने, हे स्पष्ट झाले आहे की अनेक सुपरस्टार्स या स्पर्धेत अनेक सामने लढले आहेत. समरस्लॅम पेपर व्ह्यूमध्ये सर्वाधिक सामने लढवणाऱ्या अशा टॉप 04 सुपरस्टारबद्दल जाणून घेऊया,

WWE SummerSlam
Afghanistan: क्रिकेटपटू रशीद खानच्या सामन्यातील त्या कृतीमुळे लोक भारावले
  • WWE समरस्लॅममध्ये सर्वाधिक सामने असलेले सुपरस्टार

4. ट्रिपल एच (13 सामने, 8 सामने जिंकले आणि 5 अपयशी)

Triple H
Triple HFile Image

दिग्गज सुपरस्टार ट्रिपल एच 13 सामन्यासह या प्रकरणात चौथ्या स्थानावर आहे. ट्रिपल एच ने 1995 च्या समरस्लॅम इव्हेंटमध्ये हंटर हर्स्ट हेम्सले म्हणून पेपर व्ह्यूमध्ये पदार्पण केले होते. ट्रिपल एचने या स्पर्धेत द रॉक, मॅनकाइंड, कर्ट अँगल, ग्रेट खली, रँडी ऑर्टन आणि स्टोन कोल्ड स्टीव्ह ऑस्टिन सारख्या सुपरस्टार विरूद्ध उत्कृष्ट सामने लढले आहेत. ट्रिपल एचने समरस्लॅम पेपर व्ह्यूमध्ये आपल्या या इव्हेंटमध्ये 13 पैकी 8 सामने जिंकले आहेत तर 5 सामन्यात त्याला अपयश आले आहे.

3. जॉन सीना (14 सामने, 5 विजय - 9 पराभव)

John Cena
John CenaFile Image

जॉन सीना , डब्ल्यूडब्ल्यूईच्या सर्वात प्रिय सुपरस्टारपैकी एक, 14 सामन्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. सीना 2004 मध्ये समरस्लॅममध्ये प्रथम दिसला, त्याने बुकर टी ला हरवले होते. 2005 मध्येही त्याने चांगली कामगिरी दाखवली होती, परंतु त्यानंतरचा समरस्लॅम सीनासाठी काही विशेष ठरला नाही. रेकॉर्डनुसार, हा पेपर व्ह्यूमध्ये जॉन सीनाने काही विशेश नाव कमावले नाही. जॉन सीना 14 पैकी 9 सामन्यामध्ये हरला आहे, फक्त 5 सामने तो या इव्हेंटमध्ये जिंकू शकला.

समरस्लॅम पेपर व्ह्यूमध्ये जॉन सीनाला अनेक पराभवांचा सामना करावा लागला असला तरी, 2014 मध्ये WWE वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिपच्या मुख्य स्पर्धेत सीनाचा सर्वात धक्कादायक पराभव ब्रॉक लेसनरच्या हातून झाला होता जेव्हा ब्रॉकने त्याच्यावर पूर्णपणे वर्चस्व निर्माण केले होते. सीना पिन करण्यापूर्वी, लेसनरने त्याला 16 जर्मन सुपरलेक्स आणि दोन एफ -5 मारले होते.

2. रँडी ऑर्टन: 14 सामने (7 विजय - 7 पराभव - 1 बरोबरी)

Randy Orton
Randy OrtonFile Image

रँडी ऑर्टन आतापर्यंत समरस्लॅममध्ये 15 सामने लढला आहेत आणि या वर्षी तो 16 वा समरस्लॅम सामना लढताना दिसणार आहे. रँडी ऑर्टनने समरस्लॅममध्ये रोमन रेंस, ब्रॉक लेसनर, जॉन सीना आणि ट्रिपल एच यासह अनेक प्रसिद्ध सुपरस्टारचा सामना केला आहे.

1. अंडरटेकर: 16 सामने (10 विजय-5 पराभव-1 स्पर्धा)

Undertaker
Undertaker File Image

समरस्लॅम PPV मध्ये सर्वाधिक लढती लढवण्याचा विक्रम "डेडमॅन" अंडरटेकरच्या नावावर आहे. अंडरटेकरने समरस्लॅम पीपीव्हीमध्ये केन, एज आणि रँडी ऑर्टन सारख्या सुपरस्टारविरुद्ध सामने लढले आहेत. "डेडमॅन" अंडरटेकरने 1992 पीपीव्हीमध्ये प्रथम आपला पहिला समरस्लॅम सामना लढला आणि 2005 पर्यंत दरवर्षी तो शोचा भाग होता. डेडमॅन "अंडरटेकरने 2015 मध्ये ब्रॉक लेसनरविरुद्ध शेवटचा समरस्लॅम सामना लढला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com