Amir Nasr Azadani: हिजाबविरोधी आंदोलनात सहभागाची शिक्षा; इराणच्या 'या' फुटबॉलपटुला सुनावली फाशी...

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत इराण संघाने राष्ट्रगीत गायला नकार देत आंदोलनाला दिलेला पाठिंबा
Iran Anti-Hijab Protests:
Iran Anti-Hijab Protests:Dainik Gomantak
Published on
Updated on

amir nasr azadani: इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलक विरूद्ध सरकार हा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. नुकतेच येथील न्यायालयने या आंदोलनात सहभागी झालेल्यांना विविध शिक्षा सुनावत आहेत, त्यातच आता इराणच्या एका फुटबॉल खेळाडुला फाशी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. फुटबॉलची वर्ल्डकप स्पर्धा अंतिम टप्प्यात आल्यामुळे जगभरात फुटबॉल फीव्हर निर्माण झालेला असतानाच हा निर्णय समोर आला आहे. त्यामुळे जगभरातून या निर्णयाला तीव्र विरोध देखील केला जात आहे.

(Iran Anti-Hijab Protests)

Iran Anti-Hijab Protests:
India-China Conflict: तवांग संघर्षानंतर चीनकडून 10 लढाऊ विमाने सीमेवर तैनात; 7 ड्रोनद्वारे टेहळणी...

आमीर नासर आझादानी असे या फुटबॉल प्लेयरचे नाव आहे. तो 26 वर्षांचा आहे. आमीर याने नोव्हेंबरमध्ये इराणमधील देशव्यापी हिजाब विरोधी आंदोलनात भाग घेतला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स कमांडरच्या मृत्यूचा आरोप ठेवला आहे.

आझादानी याने थोड्याच काळासाठी निदर्शनात भाग घेतला होता आणि बाकीच्यांसोबत सरकारविरोधी घोषणा दिल्या होत्या. तेव्हा आझादानी याच्याविरोधात ईशनिंदेचा आरोप लावण्यात आला होता, या आरोपासाठी इराणमध्ये मृत्यूदंड ही शिक्षा आहे. दरम्यान, फिफा वर्ल्डकप स्पर्धेत इराणच्या संघाने या आंदोलनाला पाठिंबा देत राष्ट्रगीत गायला नकार दिला होता.

Iran Anti-Hijab Protests:
Iran Anti-Hijab Protests: इराणमध्ये हिजाबविरोधी 400 आंदोलकांना सुनावली 'ही' शिक्षा

व्यावसायिक फुटबॉल खेळाडूंची आंतरराष्ट्रीय संघटना असलेल्या FIFPRO ने आमीरच्या फाशीच्या शिक्षेविरोधात आवाज उठवला आहे. आमीरने आपल्याच देशातील महिलांच्या हक्कांसाठी आणि मूलभूत स्वातंत्र्यांसाठीच्या मोहिमेत सहभासाठी फाशीची शिक्षा सुनावली गेल्याने FIFPro ला मोठा धक्का बसला आहे, असे संघटनेने सोशल मीडियात म्हटले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "आम्ही आमिरच्या पाठीशी एकजुटीने उभे आहोत आणि त्याची शिक्षा त्वरित रद्द करण्याची मागणी करत आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com