प्रो-कबड्डी लीग 2021-22: कबड्डी चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आली आहे, कारण प्रो-कबड्डी लीगचा नवीन हंगाम बुधवारपासून सुरू होत आहे. कोरोनामुळे गेल्या हंगामाचे आयोजन होऊ शकले नव्हते, परंतु यावेळी देखील सर्व सामन्यांमध्ये सर्व खबरदारी घेण्यात येत आहे आणि आणि सर्व नियम पाळण्यात येणार आहेत. बुधवारी म्हणजेच पहिल्या दिवशी, तीन सामने खेळले जाणार आहेत, ज्यामध्ये बेंगळुरू बुल्स आणि यू-मुंबा संघ एकमेकांना भिडतील. जर आपण संपूर्ण स्पर्धेबद्दल बोललो तर एकूण 12 संघ असतील.
पहिल्या दिवशीचे सामने: • बेंगळुरू बुल्स विरुद्ध यू-मुंबा: 7.30 PM
• तेलुगु टायटन्स विरुद्ध तमिळ थलायवास: 8.30 PM
• बंगाल वॉरियर्स विरुद्ध UP योद्धा: 9.30 PM
प्रो कबड्डी लीगमध्ये हे संघ आमनेसामने असतील
• दबंग दिल्ली के.सी.
• बंगाल वॉरियर्स
• U.P. योद्धा
• यू मुंबा
• हरियाणा स्टीलर्स
गेल्या काही वर्षांत प्रो-कबड्डी लीग खूप हिट ठरली आहे आणि लोकांना या खेळाचे स्वरूप आवडले आहे. अशा परिस्थितीत यापूर्वी वेगवेगळ्या शहरांमध्ये सामने आयोजित केले जात होते, परंतु यावेळी कोरोनामुळे (corona) सर्व सामने केवळ बंगळुरूमध्येच (bangalore) खेळवले जात आहेत. प्रो-कबड्डी लीगच्या मागील स्पर्धेचा शेवटचा हंगाम 2019 मध्ये झाला होता. गेल्या वेळी प्रो-कबड्डी लीगचे विजेतेपद बंगाल वॉरियर्सने जिंकले होते. अंतिम सामन्यात बंगालच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत दबंग दिल्लीचा पराभव केला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.