ऑगस्टपासून इंग्लंड(England) विरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाच्या(Indian Cricket Team) अडचणी आता वाढताना दिसत आहेत. कारण इंग्लंडमधील भारतीय क्रिकेट संघाच्या एका वरिष्ठ खेळाडूला कोरोना(Covid19) विषाणूची लागण झाली आहे. आता त्या खेळाडूला विलगीकरणात ठेवण्यात आली असल्याची माहितीही मिळत आहे.
एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार ज्या खेळाडूचा कोरोना विषाणूचा अहवाल आला आहे तो घरगुती विलगीकरणात असून हा ज्येष्ठ खेळाडू काही दिवसांनंतर डरहॅम येथील टीम कॅम्पमध्ये सामील होईल. मिळालेल्या माहितीनुसार, खेळाडूच्या घशात दुखण्याची तक्रार होती. ज्यानंतर कोरोना चाचणी झाली आणि त्याचा अवहाल पॉजिटीव्ह आला आहे.
हा खेळाडू नेमका कोण आहे याची माहिती गुपित ठेवण्यात अली आहे, मात्र या खेळाडूच्या संपर्कात आलेल्या टीम इंडियामधील सर्व सदस्यांना तीन दिवस विलगीकरणात ठेवले जाईल.आणि हा कालावधी संपल्यानंतरच हे खेळाडू संघाच्या शिबिराचा भाग बनू शकतात. या संपूर्ण प्रकरणाचे निरीक्षण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि मुख्य निवडक चेतन शर्मा करीत आहेत.
भारतीय संघात कोरोनाचे प्रकरण आढळून आल्यावर ईसीबी किंवा बीसीसीआयने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. दोन देशांमधील पहिला कसोटी सामना 4 ऑगस्टपासून खेळला जाणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.