Viral Video: अरे देवा! 'त्या' गोष्टीमुळे प्रिती झिंटाच्या काळजाचा ठोकाच चुकला...

या सामन्यात पंजाबच्या संघमालकीण प्रिती झिंटाची एक रिअँक्शन भाव खाऊन गेली जी सध्या सोशल मीडियावर जोरदार फिरत आहे.
Preity Zinta
Preity ZintaDainik Gomantak
Published on
Updated on

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात पंजाब किंग्जने रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) चेन्नई सुपर किंग्जवर (CSK) 11 धावांनी विजय मिळवला आहे. पंजाबचा सलामीवीर शिखर धवन याच्या नाबाद 88 धावांच्या जोरावर संघाने CSK ला 188 धावांचे आव्हान दिले होते, या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचे प्रयत्न तोकडे पडले म्हणायला हरकत नाही. या सामन्यात पंजाबच्या संघमालकीण प्रिती झिंटाची (Preity Zinta) एक रिअँक्शन भाव खाऊन गेली जी सध्या सोशल मीडियावर जोरदार फिरत आहे. (Preity Zinta video in IPL is going viral)

Preity Zinta
IPL 2022: CSKला फटका, सराव करताना प्रमुख खेळाडूला झाली दुखापत

पंजाब किंग्ज संघांच्या मालकीणबाई प्रिती झिंटाने या सामन्यासाठी प्रामुख्याने हजेरी लावली होती. सुमारे अर्धी स्पर्धा संपल्यानंतर, अखेर पंजाबच्या चाहत्यांची प्रिती झिंटाला स्टेडियममध्ये संघाला चीअर करताना पाहण्याची इच्छा पूर्ण झाली, प्रिती झिंटा आपल्या जुळ्या मुलांच्या जन्मानंतर त्यांच्या संगोपनात व्यस्त खुप होती. त्यामुळे IPL Mega Auction साठीही ती गैरहजर राहिली होती. तसेच, पंजाबच्या पहिल्या सात सामन्यांतही ती उपस्थित नव्हती. पण पंजाब किंग्जच्या आजच्या सामन्याला मात्र प्रितीने आवर्जुन हजेरी लावली होती. सामन्यात पंजाबचा फलंदाज भानुका राजपक्षे याला दोन वेळा झेल सुटल्याने जीवदान मिळाले आणि त्यातील पहिल्या वेळी चेंडू हवेत उंच उडाला अन् प्रितीच्या काळजाचा ठोकाच चुकला, पण नंतर त्याला झेल सुटल्यानंतर तिला बरे वाटले.

दरम्यान, IPL सामन्यांना प्रिती पहिल्यापासूनच हजेरी लावत आली आहे. त्यामुळे तिला स्टेडियममध्ये पाहण्याची चाहत्यांना जणू सवयच लागली होती पण ती सवय सुटते की काय असं वाटत असतानाच मालकीण बाईं पुन्हा संघाला चीअर करण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहिल्या होत्या. सोशल मीडियावरदेखील प्रिती झिंटाचीच चर्चा रंगत असल्याचे चित्र आहे. प्रिती झिंटाने स्टेडियममध्ये हजर राहून शिखर धवनच्या खेळीचं कौतुक केलं आहे. पंजाबच्या फलंदाजांनी चौकार षटकार लगावताच ती उभी राहून टाळ्या वाजवून खेळाडूंचं कौतुक करताना देखील दिसून आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com