IRE vs IND, 1st T20I: डेब्यू मॅचमध्ये कृष्णाचा जलवा, आयर्लंडच्या फंलदाजांना दाखवलं आस्मान

IRE vs IND, 1st T20I: भारत आणि आयर्लंड यांच्यात 3 टी-20 मालिकेतील पहिला सामना डब्लिन येथे खेळवला जात आहे.
Prasidh Krishna
Prasidh KrishnaDainik Gomantak
Published on
Updated on

IRE vs IND, 1st T20I: भारत आणि आयर्लंड यांच्यात 3 टी-20 मालिकेतील पहिला सामना डब्लिन येथे खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान पहिल्यांदा फलंदाजीसाठी आलेल्या यजमान आयर्लंड संघाच्या फलंदाजांचा भारतीय गोलंदाजांनी चांगलाच समाचार घेतला.

दरम्यान, पहिल्याच षटकात बुमराहने गोलंदाजी करण्यासाठी चेंडू हातात घेतला. त्याच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर अँड्र्यू बालबर्नीने चौकार मारत सुरुवात केली होती. पण दुसऱ्याच चेंडूवर त्याला बुमराहने त्याला आऊट केले.

तर डेब्यू मॅच खेळणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाने पहिल्याच षटकात आयर्लंडला तिसरा धक्का दिला. त्याने हॅरी टेक्टरला तिलक वर्माकडे झेलबाद केले. तर दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कृष्णाने डॉकरेलला झेलबाद केले.

Prasidh Krishna
IRE vs IND, 1st T20I: भारताकडून रिंकू सिंगबरोबरच 'या' बॉलरचेही पदार्पण, पाहा दोन्ही संघांची 'प्लेइंग-11'

प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. 31 धावांवर संघाने पाच विकेट गमावल्या. 11 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात आयर्लंडला दोन धक्के दिले. त्याने अँड्र्यू बालबर्नी (4) आणि लार्कन टकर (0) यांना बाद केले.

यानंतर, पाचव्या षटकात प्रसिद्ध कृष्णानेही पुनरागमन केले आणि पहिल्याच षटकात विकेट घेतली. त्याने हॅरी टेक्टरला बाद केले.

यादरम्यान फिरकीपटू रवी बिश्नोईने (Ravi Bishnoi) कर्णधार पॉल स्टर्लिंगला (11) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सातव्या षटकात कृष्णाने डॉकरेलला (1) बाद करुन आयर्लंडला पाचवा धक्का दिला.

Prasidh Krishna
IRE vs IND: बुमराहच्या नेतृत्वातील टीम इंडिया आयर्लंडला रवाना, असा आहे संपूर्ण दौरा

दुसरीकडे, प्रसिद्ध टीम इंडियासाठी (Team India) एकूण 14 एकदिवसीय सामने खेळला आहे. यादरम्यान त्याने 5.32 च्या इकॉनॉमी रेटने एकूण 25 विकेट घेतल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांप्रमाणेच, प्रसिद्धने आता भारतीय संघासाठी टी-20 फॉरमॅटमध्ये दमदार पदार्पण केले.

भारताची प्लेइंग इलेव्हन - ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह (कर्णधार), रवी बिश्नोई.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com