Ireland vs India, 1st T20I, Playing XI: आयर्लंड विरुद्ध भारत यांच्यात ३ सामन्यांची टी२० मालिका शुक्रवारपासून सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी मलाहाईड, डब्लिन येथे होणार आहे. द व्हिलेज मैदानावर होणाऱ्या या सामन्यात भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यातून भारताकडून रिंकू सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा या दोन खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आहे. दरम्यान रिंकूचे हे आंतरराष्ट्रीय पदार्पणही ठरले आहे. तो भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा भारताचा ३९७ वा खेळाडू ठरला आहे.
तसेच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा प्रसिद्ध कृष्णा भारताचा १०६ वा खेळाडू आणि रिंकू सिंग १०७ वा खेळाडू ठरला आहे. या दोघांनाही पदार्पणाची कॅप जसप्रीत बुमराहने दिली.
तसेच आयर्लंडने या सामन्यासाठी क्रेग यंगला संधी दिली आहे. त्याचबरोबर पुढीलवर्षी होणाऱ्या टी२० वर्ल्डकपच्या दृष्टीने आयर्लंड या मालिकेतून सुरुवात करणार आहे.
दोन्ही संघातील आमने-सामने आकडेवारीचा विचार करायचा झाल्यास आत्तापर्यंत या दोन्ही संघात ५ टी२० सामने खेळवण्यात आले असून हे पाचही सामने भारतीय संघाने जिंकले आहेत.
भारत - ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह (कर्णधार), रवी बिश्नोई
आयर्लंड - पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.