मॅथ्यू हेडनने ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा लावला क्लास, पगार कपातीवरुन म्हणाला...

ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने (Matthew Hayden) शुक्रवारी सामन्यांमधून गायब झालेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या पगारात कपात करण्याची मागणी केली आहे.
Matthew Hayden
Matthew HaydenDainik Gomantak
Published on
Updated on

ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने (Matthew Hayden) शुक्रवारी सामन्यांमधून गायब झालेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या पगारात कपात करण्याची मागणी केली आहे. कसोटी कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins), सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner), वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आणि जोश हेझलवूड (Josh Hazlewood) यांना मार्चमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी विश्रांती दिल्यानंतर हेडनचे वक्तव्य आले आहे. ते नंतर पाकिस्तानला (Pakistan) भेट देणार आहेत. या दौऱ्यात तीन कसोटींशिवाय ऑस्ट्रेलियन संघ तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. या दोन मालिका संपल्यानंतर दोन्ही संघ फक्त एक टी-20 सामना खेळणार आहेत. (Matthew Hayden called For A Reduction In The Salaries Of Players Who Have Disappeared From The Match)

दरम्यान, 'द ऑस्ट्रेलियन'ने हेडनच्या हवाल्याने म्हटले, "जेव्हा खेळाडूंची संघात निवड होत नाही, तेव्हा तुमच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जातात. तुम्ही सर्वजण खरोखरच तुमच्या देशासाठी खेळण्यास उत्सुक आहात. आणि जर तुम्हाला ते जमले नाही, तर तुमची संस्कृती उच्च दर्जाची आहे की, नाही असा प्रश्न पडेल.”

Matthew Hayden
श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा, 'हे' काम करण्यासाठी बुमराहला लाच देण्याचा केला प्रयत्न

तसेच, विश्रांती घेतलेल्या खेळाडूंपैकी, कमिन्स, वॉर्नर आणि हेझलवूड इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या हंगामात अनुक्रमे कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळणार आहेत.

देशासाठी खेळत असाल तर संधीचा फायदा घ्या

तो पुढे म्हणाला, “तुम्ही ऑस्ट्रेलियासाठी खेळायचे की नाही हे ठरवू नका. याचा माझ्यासाठी काहीही अर्थ नाही. आयपीएल किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे.''

Matthew Hayden
रवी शास्त्रीचा मोठा खुलासा; बीसीसीआयमधील काही लोकांनी असे प्रयत्न केले होते

वेतन कपात

हेडन पुढे म्हणाला, “जर तुम्ही ऑस्ट्रेलियासाठी खेळण्यासाठी उपलब्ध नसाल तर काहीतरी जबाबदारी निश्चित केली पाहिजे. तुम्ही न केलेल्या कामासाठी तुम्हाला मोबदला मिळू नये. त्यामुळे तुम्ही तुमच्या पगाराचा त्याग करावा. लोक म्हणतील की, मी सुद्धा आयपीएल खेळलो, हो हे खरे आहे. पण त्याचा माझ्या ऑस्ट्रेलियासाठी खेळण्यावर परिणाम कधीच झाला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com