CWG 2022 Sharath Kamal: कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय खेळाडू शानदार कामगिरी करत आहेत. भारताच्या पदकांची संख्या सातत्याने वाढत आहे. आता टेबल टेनिसमध्ये अचंता शरथ कमलने सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने लियाम पिचफोर्डचा पराभव केला. अशाप्रकारे आता राष्ट्रकुल 2022 मधील भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 21 झाली आहे. यासोबतच भारत पदकतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अचंता शरथ कमलचे 7 वे पदक
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील अचंता शरथ कमलचे (Achanta Sharath Kamal) हे 7 वे पदक आहे. याआधी अचंता शरथ कमलने 2006, 2010, 2014 आणि 2018 मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदके जिंकली आहेत. अशा प्रकारे त्याने सलग पाचव्या राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games) पदक जिंकले आहे. अचंता शरथ कमलने 2006 च्या मेलबर्न कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदा पदक जिंकले होते. मात्र, अचंता शरथ कमलने वयाच्या 40 व्या वर्षी सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे.
पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन यांनीही सुवर्णपदक पटकावले
त्याचवेळी भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधूने (PV Sindhu) चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. तिने बॅडमिंटन महिला एकेरीच्या सामन्यात कॅनडाच्या (Canada) मिशेल लीचा पराभव करुन सुवर्णपदक जिंकले. याआधी उपांत्य फेरीच्या सामन्यातही सिंधूने चमकदार कामगिरी केली होती. याशिवाय भारतीय बॅडमिंटनपटू (Badminton) लक्ष्य सेनने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मलेशियाच्या त्झे योंग एनजीचा पराभव करुन सुवर्णपदक जिंकले. त्याने जी योंगचा 19-21, 21-9, 21-16 असा पराभव केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.