Pakistan Cricket: पाकिस्तानी खेळाडूला 'ही' कृती पडली महागात, पीसीबीने ठोठावला मोठा दंड

Pakistan Cricket Board: पाकिस्तानमध्ये सध्या राष्ट्रीय T-20 स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेदरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठी कारवाई केली आहे.
Azam Khan
Azam KhanDainik Gomantak
Published on
Updated on

Azam Khan: पाकिस्तानमध्ये सध्या राष्ट्रीय T-20 स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेदरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठी कारवाई केली आहे. पीसीबीने आपल्याच देशाच्या खेळाडूला मोठा दंड ठोठावला आहे. या खेळाडूवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) कपडे आणि उपकरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

पीसीबीने मोठा दंड ठोठावला

पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट बोर्डाने कराची व्हाईट्स संघाचा फलंदाज आझम खानवर मोठी कारवाई केली. आझम खान हा पाकिस्तानचा माजी विकेटकीपर फलंदाज आणि कर्णधार मोईन खानचा मुलगा आहे. आझम खान पाकिस्तान संघाकडून टी-20 फॉरमॅटमध्येही खेळतो.

वास्तविक, राष्ट्रीय टी-20 सामन्यादरम्यान आझम खानने आपल्या बॅटवर पॅलेस्टाईनच्या झेंड्याचे स्टिकर लावले होते. या कारणास्तव त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्या मॅच फीच्या 50% फी कपात करण्यात आली आहे.

आयसीसीचा नियम काय सांगतो?

आयसीसीच्या नियमांनुसार, क्रिकेटपटूंना त्यांच्या कपड्यांवर किंवा बॅट, ग्लोज इत्यादी उपकरणांवर कोणतेही राजकीय, धार्मिक किंवा इतर विधान करणारे लोगो किंवा संदेश देण्याची परवानगी नाही. आयसीसीची ही आचारसंहिता देशांतर्गत सामन्यांमध्येही सर्व सदस्य मंडळांनी पाळली पाहिजे.

Azam Khan
Pakistan Cricket Board: टीम इंडियाचा हवाला देत पाकिस्तानची आयसीसीकडे अजब मागणी; जाणून घ्या नेमकं प्रकरण

दुसरीकडे, गेल्या महिन्यात 2023 च्या विश्वचषकादरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघातील जवळपास सर्वच खेळाडूंनी सोशल मीडियावर पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवला होता. त्याचवेळी, यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने विश्वचषकातील श्रीलंकेविरुद्धचे (Sri Lanka) आपले विजयी शतक गाझा येथील युद्धात बळी पडलेल्यांना समर्पित केले होते. मात्र, हा आयसीसीच्या नियमाचा भंग नव्हता.

आझम खानची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

आझम खानने 2021 मध्ये पाकिस्तान संघासाठी टी-20 फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याला पाकिस्तान संघात केवळ 5 संधी मिळाल्या आहेत. या 5 सामन्यात त्याने 2.33 च्या सरासरीने फक्त 7 धावा केल्या आहेत. मात्र, त्याने वेगवेगळ्या टी-20 लीगमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com