BCCI च्या वक्तव्याने पाकिस्तानला लागली मिरची, '2023 च्या वर्ल्ड कपसाठी...'

Pakistan Statement On 2023 World Cup: बीसीसीआयने आज झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak

India vs Pakistan: बीसीसीआयने आज झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी 2023 मध्ये आशिया कप खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले की, 'भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही आणि आशिया चषक 2023 स्पर्धा तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याची भारतीय बोर्ड मागणी करेल.'

बीसीसीआयच्या या वक्तव्यामुळे...

बीसीसीआयच्या (BCCI) या निर्णयानंतर पाकिस्तानला (Pakistan) मोठा झटका बसला आहे. सीमेपलीकडून एक धक्कादायक वक्तव्यही समोर आले आहे. पाकिस्तानचा माजी सलामीवीर सईद अन्वरने ट्विट करुन बीसीसीआयला धमकी दिली आहे. पाकिस्तानचा माजी सलामीवीर सईद अन्वर म्हणाले की, 'टीम इंडिया 2023 आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानात येत नसेल, तर पाकिस्तानी टीमने 2023 मध्ये वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात जाऊ नये.'

Team India
BCCI New President: 'रॉजर बिन्नी' यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती

2023 च्या विश्वचषकासाठी भारतात न येण्याची धमकी दिली

पाकिस्तानचा माजी सलामीवीर सईद अन्वर यांनी ट्विटमध्ये म्हटले की, 'जेव्हा सर्व आंतरराष्ट्रीय संघ आणि परदेशी खेळाडू क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तानात येतात, तेव्हा बीसीसीआयला काय अडचण आहे. जर बीसीसीआय आशिया चषक 2023 साठी तटस्थ ठिकाणी जाण्यास तयार असेल तर पाकिस्तानी संघाने पुढील वर्षी 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी तटस्थ ठिकाणी जाण्यास तयार असले पाहिजे.'

Team India
T20 World Cup: BCCI ची मोठी घोषणा, बुमराह ऐवजी या घातक गोलंदाजाची टीम इंडियात एन्ट्री

बीसीसीआयने ही माहिती दिली

आशिया कप 2023 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल. 2023 मध्ये भारतात (India) होणाऱ्या विश्वचषकापूर्वी खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे सोपवण्यात आले होते. बीसीसीआयच्या आजच्या बैठकीनंतर सचिव जय शाह म्हणाले की, 'आम्ही पाकिस्तानात जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. आम्ही तटस्थ ठिकाणी खेळू.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com