टीम इंडिया Champions Trophy साठी दौरा करणार की नाही, पाकिस्तानला टेंशन; PCB अध्यक्ष जय शाह यांच्याशी करणार चर्चा

India vs Pakistan Cricket: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला येण्याबाबत लवकर निर्णय व्हावा यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष बीसीसीआयची चर्चा करणार आहेत.
India vs Pakistan
India vs PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

PCB chairman Mohsin Naqvi want assurance from BCCI secretary Jay Shah on Team India participation in Champions Trophy 2025

क्रिकेटमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून भारत आणि पाकिस्तान संघाकडे पाहिले जाते. परंतु, गेल्या जवळपास 12 वर्षात या दोन संघात द्विपक्षीय मालिका झालेल्या नाहीत. दोन देशातील राजकिय तणावामुळे हे दोन्ही संघ आता केवळ आयसीसी स्पर्धा किंवा आशिया कप स्पर्धेतच आमने-सामने येतात.

दरम्यान, आता पुढीलवर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. अशात भारतीय संघ पाकिस्तानला जाणार का, असा मोठा प्रश्न सध्या उभा आहे.

गेल्यावर्षी एशिया कप 2023 स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जाण्यास भारताने नकार दिला होता. त्यामुळे हायब्रिड मॉडेलचा वापर करण्यात आला होता. भारताचे सामने आणि अंतिम सामना श्रीलंकेत खेळवण्यात आले होते. तसेच इतर संघांचे सामने पाकिस्तानमध्ये झाले होते.

त्यानंतर पाकिस्तानच्या संघाने मात्र वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी भारत दौरा केला होता. पाकिस्तान संघ ही स्पर्धा भारतात खेळला होता.

India vs Pakistan
India vs Pakistan Ticket Price: कट्टर प्रतिस्पर्ध्यांची अमेरिकेतही जादू, भारत-पाक सामन्याचे तिकिट 1.86 कोटींना

दरम्यान, आता भारतीय संघ फेब्रुवारी-मार्च 2025 स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये येणार की नाही, याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) नवनिर्वाचित अध्यक्ष मोहसिन नकवी हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे(BCCI) सचिव जय शाह यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हटले जात आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार पुढील आठवड्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत नकवी जय शाह यांच्याशी चर्चा करण्याती शक्यता आहे.

दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तान दौरा करण्यासाठी भारतीय संघाला भारतीय सरकारची परवानगी देखील लागणार आहे. तसेच तसेच पाकिस्तानमध्ये भारतीय संघाच्या सुरक्षेची पूर्ण खात्री करण्याच्या प्रक्रियेनंतर वैगरे हे मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात.

या प्रकरणाबाबत पीसीबीच्या एका सुत्राने पीटीआयला माहिती दिली की 'पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी हीच मोठी चिंता आहे की भारत त्यांचा संघ पाकिस्तानला पाठवणार की गेल्यावर्षी आशिया कपमधील मुद्द्यांची पुनरावृत्ती करणार. ही आयसीसीची स्पर्धा आहे आणि पाकिस्तान गेल्यावर्षी वर्ल्डकपसाठी भारतात गेले होते.'

India vs Pakistan
Women's Hockey Asian Champions Trophy: भारतीय संघाचे सुवर्णयश! फायलनमध्ये जपान पराभूत; मोठ्या बक्षीसाची घोषणा

पीसीबीच्या सुत्राने पुढे सांगितले 'भारतीय संघ पाकिस्तानला येणार की नाही, हे लवकरात लवकर कळावे, ज्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचे प्रमोशन करण्यात मदत होईल, याबद्दल नाकवी आयसीसी आणि बीसीसीआयला मनवायचा प्रयत्न करतील.'

'नाकवी हे बीसीसीआयच्या प्रतिनिधींना मनवण्याचा प्रयत्न करतील की पाकिस्तानमध्ये निवडणूक संपल्याने नवे सरकास स्थापन होईल, त्यामुळे चिंतेची गोष्ट नसेल.'

बीसीसीआयच्या सुत्राने याबद्दल सांगितले की 'पाकिस्तानमध्ये खेळण्याबाबतचा निर्णय केवळ भारत सरकार करू शकते आणि बीसीसीआयला सरकारच्या या आदेशाचे पालन करावे लागणार आहे. त्याचबरोबर सरकारकडून सध्या परवानगी मागणे घाईचे ठरेल.'

'पीसीबीचे नवे अध्यक्षांना अशी अपेक्षा असेल की फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी मार्च 2024 मध्येच अश्वासन मिळेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे.'

वर्ल्डकप 2023 स्पर्धेत पहिल्या आठ क्रमांकावर राहिलेले संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळणार आहे. दरम्यान, भारताने अखेरचा पाकिस्तानचा दौरा 2008 मध्ये केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com