Shoaib Akhtar: 'माझ्याकडे आधार कार्डही आहे', अख्तरच्या व्यत्कव्याने गदारोळ

शोएब अख्तरने 'माझ्याकडे आधार कार्डही आहे', अशी प्रतिक्रिया दिल्याने खळबळ उडाली आहे.
Pakistani Cricketer Shoaib Akhtar
Pakistani Cricketer Shoaib AkhtarDainik Gomantak

Shoaib Akhtar: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर सध्या त्याच्या विविध विधांनामुळे चर्चचा विषय ठरत असतो. नुकतेच त्याने असेच एक भाष्य केले आहे, ज्यामुळे सध्या चर्चांना उधान आले आहे. त्याने म्हटले आहे की भारतात त्याने इतक्यावेळा येणे-जाणे होते की आता त्याचे आधार कार्डही बनले आहे.

नुकताच शोएब कतारमध्ये सुरु असलेल्या लीजेंड लीग क्रिकेट मास्टर्स टूर्नामेंटमध्ये खेळत आहे. या स्पर्धेदरम्यान एका मुलाखतीत शोएबने म्हणाला आहे, 'मी भारतात येत-जात असतो. मी इथे इतके काम केले आहे की आता माझ्याकडे आधार कार्डही आहे. यापेक्षा मी अधिक काय सांगू? भारतात मला खूप प्रेम मिळते. मी भारतात क्रिकेट खेळणे मिस करतो.'

Pakistani Cricketer Shoaib Akhtar
Shoaib Akhtar: इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यानंतर शोएब अख्तरचे मोठे वक्तव्य

त्याचबरोबर आगामी आशिया चषकाचे आयोजक पाकिस्तान असले, तरी ही स्पर्धा पाकिस्तानातून हलवली जाण्याचीच शक्यता दाट आहे. याबद्दल अख्तर म्हणाला, 'जर आशिया चषक पाकिस्तानमध्ये नाही झाला, तर त्याचे आयोजन श्रीलंकेत व्हायला पाहिजे. मला आशिया चषक आणि वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघात अंतिम सामना व्हावा अशी इच्छा आहे.'

दरम्यान, याच महिन्यात म्हणजे मार्चमध्ये आशिया क्रिकेट काउंन्सिलची बैठक होणार आहे, या बैठकीदरम्यान आगामी आशिया चषकाच्या आयोजनाबद्दल चर्चा केली जाईल.

Pakistani Cricketer Shoaib Akhtar
Shoaib Akhtar Video: शोएब अख्तरने, मक्काच्या क्लॉक टॉवरवरून शेअर केले पवित्र 'खाना काबा' चे सुंदर दृश्य

लीजंड्स क्रिकेट लीगमध्ये अख्तर

सध्या सुरू असलेल्या लीजेंड लीग क्रिकेट मास्टर्स टूर्नामेंटमध्ये अख्तर एशिया लायन्स संघाचा भाग आहे. त्याने या स्पर्धेत आत्तापर्यंत एकच षटकात गोलंदाजी केली असून त्याने यात 12 धावा दिल्या आहेत.

त्याने हे षटक इंडिया महाराज संघाविरुद्ध खेळताना टाकले. त्याच्या षटकात गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पाने फलंदाजी करताना 12 धावा वसूल केल्या. मात्र हे एक षटक टाकल्यानंतर अख्तर मैदानातून बाहेर गेला आणि त्याच्याऐवजी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून इसरू उडाना मैदानात आला.

या स्पर्धेत इंडिया महाराजा, एशिया लायन्स आणि वर्ल्ड जायंट्स असे तीन संघ सामील झाले आहेत. या स्पर्धेत आत्तापर्यंत हरभजनने सर्वाधिक 8 विकेट्स घेतल्या आहेत, तर गौतम गंभीरने सर्वाधिक 183 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com