Video: पाकिस्तान-न्यूझीलंड कसोटी सामन्यात पॉर्नस्टारची चर्चा; नेटकरीही चक्रावले

Porn Star Name In Commentary: क्रिकेट कॉमेंट्री करताना अनेकदा जीभ घसरते. समालोचक किंवा पाहुण्यांना बोलायचे असते एक आणि तोंडून काहीतरी वेगळेच बाहेर पडते.
Porn Star
Porn Star Dainik Gomantak
Published on
Updated on

Porn Star Name In Commentary: क्रिकेट कॉमेंट्री करताना अनेकदा जीभ घसरते. समालोचक किंवा पाहुण्यांना बोलायचे असते एक आणि तोंडून काहीतरी वेगळेच बाहेर पडते. असाच काहीसा प्रकार कराची कसोटीत घडला, जेव्हा समालोचकाचे नाव घेण्याऐवजी तोंडातून पॉर्न स्टारचे नाव निघाले. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान ही घटना घडली आहे.

कराची टेस्ट दरम्यान घडली 'ही' घटना

कसोटी क्रिकेटला गंभीर क्रिडाप्रकार मानले जाते, पण पाकिस्तान आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील कराचीतील दुसऱ्या कसोटीत समालोचकाने वेगळीच चूक केली. न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज आणि सहकारी समालोचक डॅनी मॉरिसन यांच्यासाठी पॉर्न स्टार डॅनी डॅनियलचे नाव माइकवर जाहीरपणे बदलल्याने पाकिस्तानातील एका समालोचकाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

Porn Star
India vs New Zealand: वनडेत भारत-न्यूझीलंड संघापैकी कोण ठरलंय वरचढ, पाहा रेकॉर्ड्स

पॉर्न स्टारनेही उत्तर दिले

कराची कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात मॅट हेन्री आणि एजाज पटेल यांच्यातील 100 प्लस शेवटच्या विकेटच्या पार्टनरशिपबद्दल बोलताना समालोचकांनी मॉरिसनचा उल्लेख डॅनियल असा केला. ही व्हिडिओ क्लिप पाहताच व्हायरल झाली. त्यानंतर पॉर्न स्टारनेही यावर उत्तर दिले.

Porn Star
IND vs NZ: न्यूझीलंड संघात भीतीचे वातावरण! टीम इंडियात परतला हा 'काश्मीरी वाघ'

पाकिस्तानला 319 धावांचे लक्ष्य मिळाले

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर डेव्हन कॉनवेच्या (122) शतकाच्या जोरावर पाहुण्या संघाने पहिल्या डावात 449 धावा केल्या. यानंतर पाकिस्तानने (Pakistan) पहिल्या डावात 408 धावा केल्या. सौद शकीलने 341 चेंडूत 17 चौकार मारुन 125 धावा करुन नाबाद परतला. न्यूझीलंड संघाने चौथ्या दिवशी 5 बाद 277 धावा करुन आपला दुसरा डाव घोषित केला. यामुळे पाकिस्तानला विजयासाठी 319 धावांचे लक्ष्य मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com