Pakistan Team: बाबर आझमचे भगव्या शालीसह हैदराबादमध्ये स्वागत, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Pakistan Team: पाकिस्तान संघ गुरुवारी हैदराबादमध्ये पोहचला असून त्यांचे हॉटेल स्टाफकडून स्वागत करण्यात आले.
Babar Azam
Babar AzamDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Team Reached Hyderabad :

भारतात वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी सहभागी संघांनी भारतात हजेरी लावण्यास सुरुवात केली असून पाकिस्तान संघही बुधवारी हैदराबाद येथे पोहचला आहे. यावेळी त्यांचे हॉटेल स्टाफकडून खास स्वागत करण्यात आले.

पाकिस्तान संघ लाहोरहून दुबईमार्गे बुधवारी भारतात आला. यावेळी कडक सुरक्षा असतानाही चाहत्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. १२ वर्षानी भारतात वर्ल्डकप होत असल्याने चाहत्यांमध्ये उत्साह दिसून येत असून त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंचेही स्वागत केले.

पाकिस्तान (Pakistan) संघ हैदराबादला पोहचल्यानंतर त्यांच्या स्वागताचा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर तेथील स्टाफकडून त्यांच्यावर अत्तर शिंपडण्यात आले. तसेच त्यांचे शाल देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी खेळाडूंना विविध रंगाच्या शाल देण्यात आल्या, मात्र बाबर आझमला भगव्या रंगाची शाल दिली असल्याने चर्चेला उधाण आले. अनेक सोशल मीडिया युजर्सने ही गोष्ट अधोरेखित केली आहे. अनेकांनी त्याचा फोटोही शेअर केला आहे.

Babar Azam
Babar Azam: बाबर आझमने तिसऱ्यांदा जिंकला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार!

दरम्यान, पाकिस्तान संघ ७ वर्षांनी भारतात खेळण्यासाठी आला आहे. यापूर्वी २०१६ टी२० वर्ल्डकप खेळण्यासाठी पाकिस्तानी संघ भारतात आला होता. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या पाकिस्तान संघातील कर्णधार बाबर आझमसह अनेक खेळाडू पहिल्यांदाच भारतात खेळताना यंदा दिसणार आहेत.

दरम्यान हैदराबादला (Hyderabad) पोहचल्यानंतर झालेल्या स्वागताबद्दल बाबर आझमने इंस्टाग्राम स्टोरीला फोटो शेअर केला असून कॅप्शन लिहिले आहे की 'हैदराबादमध्ये मिळालेल्या प्रेमाने आणि पाठिंब्याने भारावलो आहे.'

तसेच यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान आणि शाहिन आफ्रिदी यांनीही इंस्टाग्राम स्टोरीवर शानदार स्वागताबद्दल कौतुक केले आहे.

Babar Azam
Babar Azam: 'जेव्हा कोहलीसारखा खेळाडू...' भारत-पाक मॅचआधी बाबरकडून विराटवर स्तुतीसुमनांचा वर्षाव

पाकिस्तान त्यांच्या वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील मोहिम ६ ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्याने सुरू करणार आहे.

त्यापूर्वी वर्ल्डकप 2023 मध्ये पाकिस्तानला पहिला सराव सामना 29 सप्टेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना खेळायचा आहे. हे दोन्ही सामने हैदराबादला होणार आहेत.

  • पाकिस्तान संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्लाह शफिक, मोहम्मद रिझवान, सौद शकिल, इफ्तिखर अहमद, सलमान अली आघा, मोहम्मद नवाझ, उस्मान मीर, हॅरिस रौफ, हसन अली, शाहिन आफ्रिदी, मोहम्मद वासिम.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com