IPL 2026: 'आयपीएल'शी स्पर्धा करणं 'पाक'ला पडलं महागात! प्रेक्षकांविना होणार सामने; परदेशी खेळाडूंची माघार

IPL Vs PSL: सर्वाधिक मोठी ब्रँड व्हॅल्यू असलेल्या आणि लोकप्रिय असलेल्या आयपीएलशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तान सुपर लीगची चोहोबाजूने कोंडी होत आहेत.
IPL Vs PSL
IPL Vs PSLDainik Gomantak
Published on
Updated on

कराची: सर्वाधिक मोठी ब्रँड व्हॅल्यू असलेल्या आणि लोकप्रिय असलेल्या आयपीएलशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तान सुपर लीगची चोहोबाजूने कोंडी होत आहेत. करार करूनही अनेक परदेश खेळाडू पाक लीग सोडून आयपीएलला प्राधान्य देत आहेत.

आयपीएलपेक्षा आम्ही कमी नाही, हे दाखवण्यासाठी पाक लीगने यंदा दोन नव्या फ्रँचायझी तयार केल्या; परंतु आखातामध्ये सुरू असलेल्या युद्धाचे कारण देत लाहोर आणि कराची येथेच सामने आणि तेही प्रेक्षकांविना खेळवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ही लीग आयपीएलच्या दोन दिवस अगोदर म्हणजेच २६ तारखेपासून सुरू केली जाणार आहे.

पाकिस्तान लीगला आता अखेरच्या क्षणी परदेशी खेळाडूंच्या माघारीचेच नव्हे तर काही खेळाडूंनी युद्धाचे कारण देत त्यांच्याशी करण्यात आलेल्या करार रकमेत वाढ करण्याची मागणी केली असल्याचे समजते.

सध्या तरी पाकिस्तान क्रिकेट मंडळ नियोजित लीग निर्धारित कार्यक्रमानुसार खेळवण्याचा तयारी करत आहे. आयपीएलसाठी वैयक्तिक कारण देत पाक लीगमधून माघार घेणाऱ्या खेळाडूंवर कारवाई न करण्याचा कारवाई विचार करत आहे, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या सूत्रांनी सांगितले.

आयपीएलमध्ये संधी मिळत असल्यामुळे पाक लीगमधून माघार घेत असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्यामुळे अशा खेळाडूंवर दोन ते चार वर्षे अशा खेळाडूंवर पाक लीगमध्ये बंदी घालण्याची चर्चा पाक क्रिकेट मंडळामध्ये झाली; पण अशा कारवाईमुळे काहीच फरक पडणार नाही. इतर परदेशी खेळाडू पाक लीगपासून दूर राहतील, या भीतीमुळे कारवाईचा मुद्दा मागे पडल्याचे सांगण्यात आले.

आयपीएल आणि पाकिस्तान लीग यामध्ये असलेली मोठी आर्थिक तफावत परदेशी खेळाडूंच्या माघारीचे प्रमुख कारण आहे. दुखापतींमुळे आयपीएलमधून काही खेळाडू माघार घेत आहेत;

पण त्यांच्या ठिकाणी मोठ्या रकमेचा करार मिळत असल्याने परदेशी खेळाडू पाक लीगमधून सहजपणे बाहेर पडत आहेत. गतवर्षी दक्षिण आफ्रिकेचा कॉर्बिन बॉश पाक लीगमधून असाच बाहेर पडला आणि मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला त्याच्यावर पाक लीगने एका वर्षाची बंदी घातली;

परंतु बॉशने चकमदार कामगिरी केली आणि तो आता मुंबई इंडियन्स संघाचा हुकमी खेळाडू झाला आहे. त्यामुळे अशा बंदीचा खेळाडूंवर काहीच परिणाम होणार नाही, असे पाक मंडळाच्या सूत्रांनी सांगितले.

भविष्यात असे प्रकार होऊ नयेत, करण्यात आलेल्या कारारांवर खेळाडू ठाम राहावे, म्हणून हा मुद्दा पाकिस्तान मंडळ आयसीसीच्या बैठकीत उपस्थित करण्याचा विचार करत आहे; परंतु या लीग व्यावसायिक आहेत. त्यांचा आयसीसीशी संबंध नाही. परिणामी, आयसीसी कोणताच हस्तक्षेप करू शकत नाही.

IPL Vs PSL
IPL 2026: "पैसे घेतात पण खेळत नाहीत!" कांगारू खेळाडूंच्या नखऱ्यांवर सुनील गावस्कर संतापले; दिला कडक इशारा

स्मिथ, लाबूशेन लाहोरमध्ये दाखल

आयपीएलमध्ये जागा रिकामी झाली तरी कोणत्याही परिस्थितीत संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट असलेले ऑस्ट्रेलियाचे स्टीव स्मिथ आणि लाबूशेल लाहोरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासह न्यूझीलंडच्या मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे आणि दक्षिण आफ्रिकेच्या ताब्रीझ शम्सी यांचाही समावेश आहे. पुढच्या दोन दिवसांत इतर परदेशी खेळाडू पाकमध्ये येतील, असे सांगण्यात आले. परदेशी प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यही लाहोरमध्ये येत असल्याचे सांगण्यात आले.

IPL Vs PSL
IPL 2026: "पैसे घेतात पण खेळत नाहीत!" कांगारू खेळाडूंच्या नखऱ्यांवर सुनील गावस्कर संतापले; दिला कडक इशारा

हे खेळाडू पाक लीगमधून आयपीएलमध्ये

गुदाकेश मोती, जॉन्सन चार्स (वेस्ट इंडीज), दासून शनाका (श्रीलंका), ब्लेसिंग मुझाराबनी (झिम्बाब्वे), स्पेन्सर जॉन्सन आणि जॅक फ्रेझर मॅकग्रथ (ऑस्ट्रेलिया), ऑटेनिल बार्टमन (दक्षिण आफ्रिका), रेहमतुल्ला गुरबाझ (अफगाणिस्तान) आणि टायमल मिल्स (इंग्लंड) हे खेळाडू पाकिस्तान लीग सोडून आयपीएलमध्ये दाखल झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com