Pakistan Cricket Board: पीसीबीचं नेमकं चाललं तरी काय! PAK संघाची जगभरातून उडवली जातेय खिल्ली

Pakistan Cricket Team: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) गेल्या काही आठवड्यांपासून मिकी आर्थरला त्यांच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
Pakistan Cricket Team
Pakistan Cricket Team Dainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Cricket Board: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) गेल्या काही आठवड्यांपासून मिकी आर्थरला त्यांच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यापूर्वी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक राहिलेल्या आर्थर यांनी पीसीबीची ऑफर नाकारली. आर्थर सध्या इंग्लिश कौंटी संघ डर्बीशायरशी निगडीत आहेत, याचे कारण देत त्याने पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता नाकारली.

आता मिळालेल्या माहितीनुसार, पीसीबी आणि आर्थर एका विशेष कोचिंग कराराच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. या करारानुसार, ते पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक म्हणून पाकिस्तान क्रिकेट संघात परतणार नाही, त्याऐवजी त्यांचे स्थान ऑनलाइन मुख्य प्रशिक्षक असेल. हा करार पूर्ण झाल्यास ते क्रिकेट जगतातील पहिले ऑनलाइन मुख्य प्रशिक्षक बनतील.

Pakistan Cricket Team
Pakistan Cricket: 'PCB हिंदूंचा द्वेष करते...' पाक क्रिकेटपटूचे वक्तव्य; BCCI कडे मागितली मदत

चालू मोसमात पाकिस्तानची अवस्था वाईट आहे

पाकिस्तान संघाची गेल्या वर्षभरात घरच्या मैदानावर अत्यंत खराब कामगिरी झाली आहे. ते पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाने धुतले होते, त्यानंतर इंग्लंडने 17 वर्षांनी पाकिस्तानचा सुपडासाफ केला होता. इंग्लंडच्या माघारीनंतर पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) घरच्या मैदानावर कसोटी मालिका जिंकता आली नाही, याउलट किवींनी कर्णधार बाबर आझमच्या संघाचा वनडे मालिकेत पराभव केला.

पीसीबीने मिकी आर्थरला ऑनलाइन प्रशिक्षक बनवण्याचा निर्णय घेतला

ही परिस्थिती बदलण्यासाठी पीसीबी कोणत्याही थराला जाऊन कोणताही प्रयोग करण्यास तयार आहे. पाकिस्तान बोर्डाचे अंतरिम अध्यक्ष नजम सेठी यांनी दक्षिण आफ्रिकेचे (South Africa) प्रशिक्षक आर्थर यांचे मन वळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला परंतु काही निष्पन्न झाले नाही. या सर्व वादानंतर दोन्ही पक्षांनी ऑनलाइन मुख्य प्रशिक्षकाचा अजब फॉर्म्युला पुढे आणला.

Pakistan Cricket Team
Pakistan Cricket: शाहीन आफ्रिदीला भरला दम, पाक क्रिकेटमधील गोंधळानंतर नवा फर्मान

तसेच, आर्थर 2016 ते 2019 दरम्यान पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक होते. त्याच्या प्रशिक्षणात पाकिस्तानने 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आर्थरने सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी टी-20 संघाला आयसीसी क्रमवारीत नंबर वन केले. 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानने खराब कामगिरी केली, त्यानंतर आर्थरच्या जागी मिसबाह-उल-हकची निवड करण्यात आली.

आता, तयार झालेल्या करारानुसार मिकी आर्थर पाकिस्तानच्या कोणत्याही दौऱ्यात संघासोबत असणार नाहीत. या संघासोबत त्यांचे काही निवडक सपोर्ट स्टाफ असतील आणि ते स्वत: इंटरनेटच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाकिस्तानी खेळाडूंशी संवाद साधतील. अहवालानुसार, मिकी आर्थर यांची 1 एप्रिल रोजी सल्लागार म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते.

Pakistan Cricket Team
Babar Azam: जागतिक क्रिकेटवर बाबरचा दबदबा, विराट-रोहितला मागे टाकत रचला इतिहास!

सोशल मीडियावर पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली

मिकी आर्थरची ऑनलाइन प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याच्या बातमीने सोशल मीडियावरही चर्चा सुरु झाली आहे. पाकिस्तानी क्रिकेट चाहते पीसीबीच्या या प्रयोगाचा आनंद घेत आहेत. ट्विटरवर सातत्याने एकापेक्षा एक मीम बनवले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com