Pakistan Vs Sri Lanka: श्रीलंकेच्या भूमीवर पाकिस्तानने रचला इतिहास, यजमानांचा लाजिरवाणा पराभव

Pakistan Vs Sri Lanka: पाकिस्तानच्या संघाने एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवला, जो पाकिस्तानचा परदेशी भूमीवरील सर्वात मोठा विजय आहे.
Pakistan Team
Pakistan Team Dainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Vs Sri Lanka: पाकिस्तानने श्रीलंकेच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला आहे, तर यजमानांना घरच्या भूमीवर कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव पत्करावा लागला आहे.

श्रीलंकेत सर्वाधिक कसोटी मालिका जिंकणारा पाकिस्तान हा जगातील एकमेव संघ आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या संघाने एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवला, जो पाकिस्तानचा परदेशी भूमीवरील सर्वात मोठा विजय आहे.

दरम्यान, पाकिस्तान (Pakistan) संघाने आतापर्यंत परदेशात एकाही संघाला एक डाव आणि 200 किंवा त्याहून अधिक धावांच्या फरकाने पराभूत केले नव्हते, परंतु आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तानने परदेशी भूमीवर श्रीलंकेविरुद्ध एक डाव आणि 222 धावांच्या फरकाने विजय मिळवला आहे.

त्याचवेळी, श्रीलंकेच्या संघाला त्यांच्याच भूमीवर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला आहे. गोलंदाजी असो की फलंदाजी या सामन्यात श्रीलंकेचा संघ पूर्णपणे अपयशी ठरला.

Pakistan Team
Sri Lanka vs Ireland: RCB च्या 'या' स्टार गोलंदाजाने केला मोठा कारनामा, वकार युनूसच्या रेकॉर्डशी केली बरोबरी

दुसरीकडे, मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास, पहिला सामनाही पाकिस्तानने जिंकला होता, जिथे गालेमध्ये श्रीलंकेला 4 विकेटने पराभव स्वीकारावा लागला होता आणि आता दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने एकतर्फी विजय मिळवला.

अशाप्रकारे श्रीलंकेचा (Sri Lanka) 2-0 ने पराभव झाला आणि ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानची विजयाची टक्केवारी 100 झाली आहे.

Pakistan Team
India vs Sri Lanka: तिसऱ्या वनडेत बेंच स्ट्रेंथ आजमवणार टीम इंडिया? अशी असेल Playing XI

पाकिस्तानचा कसोटी सामन्यातील सर्वात मोठा विजय

आज श्रीलंकाविरुद्ध डाव आणि 222 धावा

बांगलादेशविरुद्ध डाव आणि 184 धावा, 2011

बांगलादेशविरुद्ध डाव आणि 178 धावा, 2002

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com