Sri Lanka vs Ireland: RCB च्या 'या' स्टार गोलंदाजाने केला मोठा कारनामा, वकार युनूसच्या रेकॉर्डशी केली बरोबरी

Wanindu Hasaranga: विश्वचषक पात्रता फेरीत श्रीलंकेने आयर्लंडचा 133 धावांनी पराभव केला. या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली.
Wanindu Hasaranga
Wanindu HasarangaDainik Gomantak
Published on
Updated on

Sri Lanka vs Ireland: विश्वचषक पात्रता फेरीत श्रीलंकेने आयर्लंडचा 133 धावांनी पराभव केला. या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. त्याचवेळी, श्रीलंकेच्या गोलंदाजाने शानदार गोलंदाजी केली. या गोलंदाजाने वकार युनूसच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. चला चर मग त्याबद्दल जाणून घेऊया.

या खेळाडूने मोठा कारनामा

दरम्यान, श्रीलंकेचा गोलंदाज वानिंदू हसरंगा शानदार फॉर्ममध्ये आहे. विश्वचषक पात्रता फेरीत त्याने शानदार गोलंदाजी केली आहे. त्याने आयर्लंडविरुद्ध 10 षटकात 79 धावा देऊन 5 बळी घेतले. याआधी त्याने यूएईविरुद्ध 6, ओमानविरुद्ध 5 विकेट्स घेतल्या होत्या.

त्याने सलग तीन सामन्यांत 5 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. हसरंगाच्या आधी एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात 1990 मध्ये पाकिस्तानच्या वकार युनूसने सलग तीन सामन्यांत 5 विकेट घेतल्या होत्या.

आता 33 वर्षांनंतर हसरंगाने आपल्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. हसरंगा आयपीएलमध्ये आरसीबीकडून (RCB) खेळतो.

Wanindu Hasaranga
India vs Sri Lanka ODI: इतिहास घडला! भारताचा श्रीलंकेवर 317 धावांनी आजवरचा सर्वात मोठा विजय

या फलंदाजाने शतक झळकावले

श्रीलंकेविरुद्ध आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो चुकीचा ठरला. पथुम निशांकने श्रीलंकेसाठी शानदार कामगिरी केली. त्याचवेळी, दिमुथ करुणारत्नेने 103 चेंडूत 103 धावा केल्या. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले शतक आहे.

त्याने एक मोठी खेळी खेळून एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या 1000 धावाही पूर्ण केल्या आहेत. दिमुथशिवाय सदीरा समरविक्रमाने 82 धावांची खेळी केली. या खेळाडूंमुळेच श्रीलंकेने 325 धावा केल्या.

Wanindu Hasaranga
India vs Sri Lanka: टीम इंडियात दोन बदल, सूर्यकुमारलाही संधी; पाहा दोन्ही संघांची Playing XI

श्रीलंकेच्या गोलंदाजांनी आश्चर्यकारक कामगिरी केली

दुसरीकडे, मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. जेव्हा पॉल स्टर्लिंग 6 धावा करुन बाद झाला. आयर्लंडकडून कर्टिस कॅम्फरने सर्वाधिक 39 धावा केल्या. आयर्लंडचा संपूर्ण संघ 192 धावांत ऑलआऊट झाला.

श्रीलंकेकडून (Sri Lanka) कसून रंजिथा, लाहिरु कुमारा आणि दासुन शनाका यांनी 1-1 विकेट घेतली. वानिंदू हसरंगाच्या खात्यात 5 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com