Pakistan vs New Zealand: पाकिस्तानच्या 'या' धाकडचा करिष्मा, न्यूझीलंडविरुद्ध केला विश्वविक्रम

Naseem Shah Bowling: पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि नसीम शाह यांनी अप्रतिम कामगिरी केली.
Pakistan vs New Zealand
Pakistan vs New ZealandDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan vs New Zealand 1st ODI: पाकिस्तानने पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 6 विकेटने पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि नसीम शाह यांनी अप्रतिम कामगिरी केली. नसीम शाहने आपल्या गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली. त्याने या सामन्यात 5 विकेट घेतल्या आणि सामन्यात एका मोठ्या विक्रमाची नोंद केली. त्याबद्दल जाणून घेऊया.

नसीम शाहाने हा विक्रम केला

नसीम शाहने न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) शानदार गोलंदाजी केली. त्याच्यामुळेच पाकिस्तानी संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. नसीम शाहने 10 षटकात 57 धावा देत 5 बळी घेतले. तो संघासाठी सर्वात मोठा सामना विजेता म्हणून उदयास आला आहे. नसीमने गेल्या वर्षी नेदरलँड्सविरुद्धही 5 विकेट घेतल्या होत्या.

Pakistan vs New Zealand
Pakistan vs New zealand: पाकिस्तानची फायनलमध्ये 'धडक', उपांत्य फेरीतून न्यूझीलंड आऊट

तसेच, नसीम शाहने पहिल्या 4 सामन्यात एकूण 15 फलंदाजांना बाद केले. तो 4 एकदिवसीय सामन्यांनंतर सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियाच्या रायन हॅरिस आणि गॅरी गिलमोर यांच्या नावावर होता. दोघांनी पहिल्या चार सामन्यात 14-14 विकेट घेतल्या.

Pakistan vs New Zealand
India vs New Zealand: BCCI ने अचानक घेतला मोठा निर्णय, न्यूझीलंडविरुद्धच्या T20 मालिकेतून...!

रिझवानने तुफानी खेळी खेळली

बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनीही पाकिस्तानच्या (Pakistan) विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. दोन्ही फलंदाजांनी तुफानी फलंदाजी करत अर्धशतके झळकावली. बाबरने 66 धावा केल्या. त्याचवेळी मोहम्मद रिझवानने 77 धावांची खेळी केली. याशिवाय सलामीवीर फखर जमानने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. त्याने 56 धावा केल्या. या फलंदाजांच्या जोरावर पाकिस्तानी संघ हा सामना 6 विकेटने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com