Pakistan Cricket Team Fixing: यांना लाज कशी वाटत नाही? पाकिस्तानी खेळाडूंवर मॅच-फिक्सिंगचे गंभीर आरोप! PCB ने सुरु केली चौकशी

Pakistan Cricket Match Fixing Allegations: लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात तब्बल 194 धावांनी दारुण पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी संघात भूकंपाचे सत्र पाहायला मिळत आहे.
Pakistan Cricket Match Fixing Allegations
Match FixingDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Cricket Match Fixing Allegations: लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात तब्बल 194 धावांनी दारुण पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी संघात भूकंपाचे सत्र पाहायला मिळत आहे. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने धक्कादायक निर्णय घेत मोहम्मद रिझवान, सलमान अली आगा, इमाम उल हक, अली उस्मान, खुर्रम शहजाद, आमिर जमाल आणि मोहम्मद अवैस जफर या खेळाडूंना थेट मालिकेच्या मध्यमातच मायदेशी बोलावले.

खेळाडूंसोबतच मुख्य प्रशिक्षक सर्फराज अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांनाही दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतावे लागले. या कारवाईनंतर आता पाकिस्तान क्रिकेट संघावर पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप होऊ लागल्याने क्रिकेट जगतात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Pakistan Cricket Match Fixing Allegations
India VS Pakistan: वर्ल्ड कप नाही, आशिया कपही नाही... तरीही भिडणार भारत-पाकिस्तान; 'आयसीसी'चा मेगा प्लॅन तयार

मालिकेच्या मध्यमातच खेळाडू आणि प्रशिक्षकांना अचानक परत का बोलावण्यात आले, असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे. रिपोर्टनुसार, खेळाडूंना परत बोलावण्याचे कारण त्यांचा खराब फॉर्म नसून इतर काही गंभीर बाबी आहेत. या संवेदनशील विषयावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड दोघांनीही मौन बाळगले असले तरी, रोज समोर येणाऱ्या नवीन माहितीमुळे पीसीबी (PCB) प्रचंड दबावाखाली आहे.

Pakistan Cricket Match Fixing Allegations
Pakistan Cricket: मालिकेत लाजिरवाणा पराभव, आता खेळाडूंचे फोनही जप्त! PCB चा अजब कारभार; पाकिस्तान क्रिकेटमधील वाद काय संपेना

याप्रकरणी पीसीबीच्या डिजिटल मीडिया संचालकांनी स्पष्ट केले की, खेळाडूंच्या शिस्तभंगाच्या आणि अयोग्य वर्तनाच्या रिपोर्टनंतर अंतर्गत तपास सुरु करण्यात आला आहे. सर्व नियम व मानकांनुसार या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असून, अधिकृत निवेदनाशिवाय कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पीसीबीने केले आहे.

Pakistan Cricket Match Fixing Allegations
Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात मोठी उलथापालथ! रिझवानसह 7 खेळाडू OUT, तब्बल 5 अनकॅप्ड खेळाडूंना संघात संधी

पाकिस्तानच्या '365 न्यूज' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पीसीबीने उर्वरित खेळाडूंचे मोबाईल फोन जप्त केले असून, शेवटचा कसोटी सामना संपेपर्यंत हे फोन बोर्डाच्या ताब्यातच राहणार आहेत. आयसीसीच्या नियमांनुसार खेळाडूंना केवळ सामन्यादरम्यानच मोबाईल वापरण्यास बंदी असते, सामना संपल्यावर फोन त्यांच्याकडेच राहतो. अशा परिस्थितीत पीसीबीच्या या अजब निर्णयामुळे मॅच फिक्सिंगचा संशय अधिकच बळावला आहे.

Pakistan Cricket Match Fixing Allegations
Pakistan Cricket: 'PCB हिंदूंचा द्वेष करते...' पाक क्रिकेटपटूचे वक्तव्य; BCCI कडे मागितली मदत

यापूर्वी, 2010 च्या इंग्लंड दौऱ्यातही सलमान बट, मोहम्मद आमीर आणि मोहम्मद आसिफ यांच्यावर स्पॉट फिक्सिंगचे गंभीर आरोप झाले होते. त्या जुन्या आठवणी ताज्या झाल्याने पीसीबीच्या गोटात पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले आहे. प्रत्येक काही महिन्यांनी एका नव्या वादात अडकण्याची परंपरा कायम ठेवत पाकिस्तान क्रिकेटने पुन्हा एकदा स्वतःचे हसे करुन घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com