अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या कर्णधाराने रचला इतिहास

संघाच्या आठ फलंदाजांना दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही.
Qasim Akram
Qasim Akram Dainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या आठवड्यात आयसीसी अंडर-19 विश्वचषक 2022 च्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर, गुरुवारी या स्पर्धेत पाचव्या स्थानासाठी पाकिस्तान आणि श्रीलंका संघांमध्ये सामना झाला. पाकिस्तानने हा सामना 238 धावांनी जिंकला. सर व्हिव्हियन रिचर्ड्स क्रिकेट मैदानावर पाकिस्तानचे (Pakistan) सलामीवीर महंमद शहजाद आणि हसिबुल्ला खान यांनी शानदार फलंदाजी केली. या जोडीने पाकिस्तानला बिनबाद 100 पर्यंत नेले. शहजादने अखेरीस 69 चेंडूत 73 धावा केल्या आणि रवीन डी सिल्वाने त्याला बाद केले. (Qasim Akram u-19 World Record)

Qasim Akram
Team India: मोहम्मद शमी नसता तर...

यानंतर कर्णधार कासिम अक्रम खान हसिबुल्ला खानला सपोर्ट करण्यासाठी क्रीझ वर आला. दोघांनी शतके झळकावून पाकिस्तानची धावसंख्या 350 च्या पुढे नेली. संघाने 50 षटकात 365/3 धावा केल्या. अक्रम 135 धावांवर नाबाद राहिला. हसीबुल्ला 136 धावा करून बाद झाला. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव 34.2 षटकांत 127 धावांत गारद झाला. ड्युनिथ वेलेझ (40) आणि विनुजा रणपुली (नाबाद 53) वगळता एकाही फलंदाजाला पाकिस्तानी गोलंदाजांचा सामना करता आला नाही. संघाच्या आठ फलंदाजांना दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही.

कासिमने इतिहास रचला

फलंदाजीत कमाल दाखवणारा पाकिस्तानी कर्णधार कासिम गोलंदाजीसाठी आला, तेव्हा श्रीलंकेचे फलंदाज उद्ध्वस्त झाले. फलंदाजांनी त्याच्यासमोर गुडघे टेकले. त्याने 10 षटकात 37 धावा देत 5 विकेट घेतले. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कासिमने आपल्या अष्टपैलू कामगिरीने इतिहास रचला. आयसीसी अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत एकाच सामन्यात शतक आणि पाच विकेट घेणारा तो पहिला क्रिकेटर ठरला. या शानदार कामगिरीसाठी तो सामनावीरही ठरला. शुक्रवारी, पहिल्या उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या अफगाणिस्तानच्या संघाचा दुसऱ्या उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध तिसऱ्या क्रमांकासाठी सामना होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात शनिवारी अंतिम सामना होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com