PAK vs NZ: फखर जमानने तीन सामन्यात 3 शतके ठोकून रचला इतिहास, मोडला बाबर आझम-विव रिचर्ड्सचा रेकॉर्ड!

PAK vs NZ: न्यूझीलंडच्या 337 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झमानने किवी गोलंदाजांची धुलाई केली.
Fakhar Zaman
Fakhar Zaman Dainik Gomantak
Published on
Updated on

PAK vs NZ: पाकिस्तानचा स्टार फलंदाज फखर जमानने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला. शनिवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जमानने शानदार खेळी करत सलग तिसरे शतक झळकावले.

न्यूझीलंडच्या 337 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जमानने किवी गोलंदाजांची धुलाई केली. यासह त्याने या खेळीतून अनेक मोठे विक्रमही केले.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 3000 धावा करणारा पाकिस्तानी फलंदाज

फखर जमान हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 3000 धावा करणारा पाकिस्तानी फलंदाज ठरला आहे. त्याने 67 व्या डावात हे स्थान गाठले. फखरने बाबर आझम (Babar Azam) आणि व्हिव्हियन रिचर्ड्स यांचा विक्रम मोडीत काढला.

बाबरने 68व्या डावात तर रिचर्ड्सने 69व्या डावात हा विक्रम केला. यासह, तो सर्वात जलद 3000 धावा करणारा जगातील तिसरा फलंदाज बनला.

त्याच्याआधी, वेस्ट इंडिजच्या शाई होपने 67 व्या डावात आणि दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम आमलाने 57 व्या डावात हे स्थान गाठले आहे.

या सामन्यापूर्वी फखरने 66 सामन्यात 2902 धावा पूर्ण केल्या होत्या. या सामन्यात त्याने 98 धावा करत हा विक्रम केला.

Fakhar Zaman
PAK vs NZ: नसीम शाहने केला जागतिक रेकॉर्ड, मॅट हेन्रीला टाकले मागे

सलग तीन शतके करणारा चौथा फलंदाज

यासह फखरने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग तीन शतके झळकावणारा तो पाकिस्तानचा (Pakistan) चौथा फलंदाज ठरला.

त्याच्या आधी झहीर अब्बास, सईद अन्वर आणि बाबर आझम या पाकिस्तानी फलंदाजांनी हा पराक्रम केला आहे. बाबरने हा पराक्रम दोनदा केला आहे.

दुसरीकडे, श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगकाराच्या नावावर एकूण विक्रमाची नोंद आहे, ज्याने सलग 4 शतके ठोकून विश्वविक्रम केला.

एकदिवसीय सामन्यांमध्ये 45 पेक्षा जास्त सरासरी आणि 90 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटसह फखर हा पहिला पाकिस्तानी फलंदाज बनला.

Fakhar Zaman
PAK vs NZ: बाबर आझमने केला आणखी एक विराट 'रेकॉर्ड', क्रिकेटच्या देवाला सोडले मागे!

फखर जमानची वनडेत सलग तीन शतके

101 धावा विरुद्ध न्यूझीलंड, 13 जानेवारी 2023

117 धावा विरुद्ध न्यूझीलंड, 27 एप्रिल 2023

शतक विरुद्ध न्यूझीलंड, 29 एप्रिल 2023

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com