Babar Azam Record: जागतिक क्रिकेटमध्ये कोणी ना कोणी रेकॉर्ड करतच असतो. दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
खरे तर, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12000 धावांचा आकडा गाठला आहे आणि सर्वात कमी डावात अशी कामगिरी करणारा तो आशियातील दुसरा फलंदाज ठरला आहे.
हा रेकॉर्ड करताना बाबर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सुनील गावस्कर यांसारख्या दिग्गजांपेक्षा पुढे गेला असेल, पण तो भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीच्याही पुढे जाऊ शकला नाही. विराट अजूनही त्याच्या पुढे आहे.
दरम्यान, बाबरने 277 डावांमध्ये 12000 धावा पूर्ण केल्या, तर विराटने 276 डावांमध्ये हा आकडा गाठला आहे.
यामध्ये बाबरने क्रिकेटच्या देवाला म्हणजेच सचिन तेंडुलकरला मागे सोडले आहे. सचिनपेक्षा कमी डावात अशी कामगिरी करणारा तो फलंदाज ठरला आहे.
दुसरीकडे, जर जागतिक क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास, वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार व्हिव्ह रिचर्ड्स हे 255 डावात 12000 धावा करणारे जगातील नंबर वन फलंदाज आहेत.
1. विराट कोहली-276
2. बाबर आझम-277
3. जावेद मियांदाद - 284
4. सचिन तेंडुलकर-288
5. सुनील गावस्कर-289
1. विव्ह रिचर्ड्स - 255
2. हाशिम आमला -264
3.स्टीव्ह स्मिथ -269
4.जो रुट -275
5. विराट कोहली -277
6. बाबर आझम -277
दुसरीकडे, पाकिस्तान (Pakistan) आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात बाबरने या सामन्यात 49 धावांची खेळी केली.
या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा 5 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानकडून फखर झमान आणि न्यूझीलंडकडून डॅरेल मिशेल यांनी शतकी खेळी खेळली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.