PAK vs NED: पाकिस्तानच्या खेळाडूंची धावा काढण्यासाठी धडपड, पण हा रनआऊट पाहून तुम्हीही म्हणाल किती ही पळ-पळ...

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ खूप संघर्ष करताना दिसला.
 Mohammad Nawaz
Mohammad NawazDainik Gomntak
Published on
Updated on

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ खूप संघर्ष करताना दिसला. पाकिस्तानचा संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही.

बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ 49 षटकांत केवळ 286 धावा करु शकला. पाकिस्तानच्या बहुतेक सामन्यांमध्ये चाहत्यांना असे काही पाहायला मिळते ज्यामुळे त्यांना हसू आवरता येत नाही.

असेच काहीसे नेदरलँड्सविरुद्धच्या (Netherlands) सामन्यातही पाहायला मिळाले. जेव्हा मोहम्मद नवाज त्याच्याच कॉलवर धावबाद झाला.

दरम्यान, पाकिस्तानकडून यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी 68-68 धावांचे योगदान दिले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी केली. नेदरलँड्सकडून बास डॅलिडेने चार बळी घेतले.

पाकिस्तानच्या (Pakistan) डावाच्या 47 व्या षटकात, शाहीन आफ्रिदीला रिव्हर्स स्वीप खेळायचा होता. मात्र चेंडू फेल गेला. दरम्यान, नॉन स्ट्राइकवर उभा असलेला नवाज धाव काढण्यासाठी धावला, त्याचदरम्यान शाहीनने त्याला परत जाण्यास सांगितले आणि तो परत गेला.

दरम्यान, चेंडू नॉन-स्ट्रायकरकडे गेला पण गोलंदाजाला तो पकडता आला नाही आणि त्याचा फायदा घेण्यासाठी शाहीनने पुन्हा नवाजला हाक दिली पण नवाज धाव पूर्ण करु शकला नाही आणि धावबाद झाला, त्यानंतर तो खूपच निराश दिसला.

 Mohammad Nawaz
PAK vs NED: मोहम्मद रिझवान आणि सौद शकील जोडीचा मोठा कारनामा, 12 वर्षांनंतर रचला इतिहास

दुसरीकडे, मोहम्मद नवाज बाद झाला तेव्हा त्याने 43 चेंडूत 39 धावा केल्या. तो अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करत होता. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले.

राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर फखर जमान (12), इमाम उल हक (15) आणि बाबर आझम (5) यांच्या विकेट्स अवघ्या 38 धावांत गमावल्याने पाकिस्तानचा संघ अडचणीत आला होता, पण रिझवान आणि सौदने शानदार प्रदर्शन केले.

मोहम्मद नवाज (39) आणि शादाब खान (32) यांनी धावसंख्या आव्हानात्मक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शाहीन शाह आफ्रिदी (नाबाद 13) आणि हारिस रौफ (16) यांनी शेवटच्या षटकांमध्ये वेगवान धावा काढण्याचा प्रयत्न केला पण संपूर्ण संघ 49 षटकांत 286 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com