PAK vs NED: मोहम्मद रिझवान आणि सौद शकील जोडीचा मोठा कारनामा, 12 वर्षांनंतर रचला इतिहास

PAK vs NED : पाकिस्तानच्या पहिल्या तीन खेळाडूंना लवकर पॅव्हेलियनमध्ये पाठवून संघाने खळबळ उडवून दिली.
Mohammad Rizwan & Saud Shakeel
Mohammad Rizwan & Saud Shakeel Dainik Gomantak
Published on
Updated on

Two Pakistan World Cup debutants with 50-plus scores in the same match Mohammad Rizwan & Saud Shakeel PAK vs NED : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या दुसऱ्या सामन्यात आज पाकिस्तान आणि नेदरलँड्सचे संघ आमनेसामने आहेत.

जरी नेदरलँड्स हा दुबळा संघ मानला जात असला तरी या संघाने पाकिस्तानविरुद्ध दमदार प्रदर्शन केले आहे. पाकिस्तानच्या पहिल्या तीन खेळाडूंना लवकर पॅव्हेलियनमध्ये पाठवून संघाने खळबळ उडवून दिली.

मात्र, त्यानंतर मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी संघाला संकटातून बाहेर काढलेच शिवाय नवा विक्रमही केला. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात असे केवळ दोनदाच घडले आहे, आता तिसऱ्यांदा इतिहास रचला गेला आहे.

मोहम्मद रिझवान आणि सौद शकील एकदिवसीय विश्वचषकातील पहिला सामना खेळत आहेत

पाकिस्तानसाठी (Pakistan), मोहम्मद रिझवान आणि सौद शकील आज एकदिवसीय विश्वचषकातील पहिला सामना खेळण्यासाठी आले आहेत.

2019 मध्ये जेव्हा 50 षटकांचा विश्वचषक झाला तेव्हा पाकिस्तानचा यष्टिरक्षक सर्फराज अहमद होता. आता तो संघात नाही, त्याच्या जागी मोहम्मद रिझवान ही जबाबदारी पार पाडत आहे. मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली.

एकीकडे मोहम्मद रिझवानने 68 धावा केल्या तर दुसरीकडे सौद शकीलनेही तेवढ्याच धावांची खेळी केली. पाकिस्तानसाठी पहिला एकदिवसीय विश्वचषक खेळणाऱ्या दोन फलंदाजांनी अर्धशतकं झळकावताना याआधी दोनदाच असं घडलं आहे.

1975 मध्ये माजीद खानने 65 धावांची तर आसिफ इक्बालने 53 धावांची इनिंग खेळली होती. यानंतर, 2011 मध्ये, मिसबाह उल हकने 65 धावा केल्या आणि उमर अकमलने 71 धावा केल्या होत्या.

पाकिस्तानची टॉप ऑर्डर पुन्हा चालली नाही

आजच्या सामन्यात पाकिस्तानच्या टॉप ऑर्डरबद्दल बोलायचे झाल्यास, सलामीवीर फखर जमानची फ्लॉप कामगिरी कायम आहे. त्याने 15 चेंडूत 12 धावांची खेळी केली. तर इमाम उल हक 19 चेंडूत 15 धावा करुन बाद झाला.

कर्णधार बाबर आझम (Babar Azam) पुन्हा एकदा चालला नाही. त्याने 18 चेंडूत पाच धावांची छोटी खेळी खेळली. तर मोहम्मद रिझवानने 75 चेंडूत 68 धावा केल्या.

दुसरीकडे, सौद शकीलनेही 52 चेंडूत 68 धावा केल्या. मात्र, इफ्तिखार अहमदला 37 चेंडूत केवळ 34 धावा करता आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com