IPL 2023 Awards and Prize Money: चेन्नई-गुजरातच नाही, तर 'हे' खेळाडूही मालामाल! पाहा पुरस्कारांची संपूर्ण लिस्ट

आयपीएल 2023 मध्ये पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंवरही मोठ्या बक्षीस रकमेची बरसात झाली आहे.
CSK
CSKDainik Gomantak

IPL 2023 Awards and Prize Money: सोमवारी मध्यरात्री (30 मे) इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेला विजेता संघ मिळाला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्स विरुद्ध 5 विकेट्सने विजय मिळवत विजेतेपदाला गवसणी घातली.

रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात अखेरच्या दोन चेंडूंवर विजयासाठी 10 धावांची गरज असताना रविंद्र जडेजाना एक षटकार आणि चौकार मारत चेन्नईला विजय मिळवून दिला. चेन्नईचे हे पाचवे विजेतेपद ठरले आहे.

चेन्नईने विजय मिळवल्याने त्यांना 20 कोटी रुपये बक्षीस रक्कम देण्यात आली, तर उपविजेत्या गुजरातला 12.5 कोटी रुपये देण्यात आले. तसेच आयपीएल 2023 स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार शुभमन गिलला देण्यात आला.

गिलने या हंगामात सर्वाधिक धावा करताना ऑरेंज कॅपही जिंकली. त्याने 17 सामन्यांमध्ये 59.33 च्या सरासरीने 890 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 3 शतकांचा समावेश आहे. तसेच उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार यशस्वी जयस्वालला देण्यात आला.

CSK
IPL 2023 Champion: जड्डूचा विजयी चौकार अन् थालानं घेतलं कडेवर! पाहा CSK चे विनिंग मोमेंट्स

चेन्नईचा विजय

अंतिम सामन्यात गुजरातने वृद्धिमान साहा (54) आणि साई सुदर्शन (96) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकात 4 बाद 214 धावा केल्या होत्या. पण नंतर चेन्नईच्या फलंदाजीवेळी सुरुवातीलाच पाऊस आल्याने डकवर्थ लुईसनुसार चेन्नईसमोर 15 षटकात 171 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते.

चेन्नईकडून रविंद्र जडेजा 6 चेंडूत 15 धावांवर नाबाद राहिला. तसेच शिवम दुबे 21 चेंडूत 32 धावांवर नाबाद राहिला. याशिवाय चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 47 धावा केल्या. तसेच ऋतुराज गायकवाड (26), अजिंक्य रहाणे (27) आणि अंबाती रायुडू (19) यांनीही छोटेखानी महत्त्वाच्या खेळी केल्या. गुजरातकडून मोहित शर्माने 3 आणि नूर अहमदने 2 विकेट्स घेतल्या.

CSK
IPL 2023: धोनी फॅनसाठी आनंदाची बातमी, पुढच्या मोसमातही दिसणार 'माही मॅजिक'

पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी -

 • विजेता संघ - चेन्नई सुपर किंग्स (20 कोटी)

 • उपविजेता संघ - गुजरात टायटन्स (12.5 कोटी)

 • अंतिम सामन्यातील सामनावीर - डेव्हॉन कॉनवे - 1 लाख

 • अंतिम सामन्यातील सुपर स्ट्रायकर - अजिंक्य रहाणे (चेन्नई सुपर किंग्स) - 1 लाख

 • अंतिम सामन्यातील गेम चेंजर - साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) - 1 लाख

 • अंतिम सामन्यातील व्हॅल्युएबल खेळाडू - साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) - 1 लाख

 • अंतिम सामन्यातील सुपर फोर - साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) - 1 लाख

 • अंतिम सामन्यातील सर्वात लांब षटकार - साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) - 1 लाख

 • अंतिम सामन्यातील सर्वोत्तम झेल - एमएस धोनी (चेन्नई सुपर किंग्स) - 1 लाख

 • आयपीएल 2023 मधील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू - यशस्वी जयस्वाल (राजस्थान रॉयल्स) - 10 लाख

 • आयपीएल 2023 मधील इलेक्ट्रिक स्ट्रायकर - ग्लेन मॅक्सवेल (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) - 10 लाख

 • आयपीएल 2023 मधील गेम चेंजर - शुभमन गिल (गुजरात टायटन्स) - 10 लाख

 • आयपीएल 2023 मधील मालिकावीर - शुभमन गिल (गुजरात टायटन्स) - 10 लाख

 • आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक चौकार - शुभमन गिल (गुजरात टायटन्स) - 10 लाख

 • आयपीएल 2023 मधील सर्वात लांब षटकार - फाफ डू प्लेसिस (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) - 10 लाख

 • आयपीएल 2023 मधील सर्वोत्तम झेल - राशिद खान (गुजरात टायटन्स) - 10 लाख

 • ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) - शुभमन गिल (गुजरात टायटन्स) - 10 लाख

 • पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स) - मोहम्मद शमी (गुजरात टायटन्स) - 10 लाख

 • फेअर प्ले - दिल्ली कॅपिटल्स - 10 लाख

 • आयपीएल 2023 मधील सर्वोत्तम खेळपट्टी आणि मैदान - इडन गार्डन्स आणि वानखेडे स्टेडियम - 50 लाख

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com