Omicron Impact: परदेशी खेळाडूंना फुटबॉल स्पर्धेत ‘नो एंट्री’

दिल्ली, बंगळूर आणि पश्चिम बंगालमधील साखळी फुटबॉल स्पर्धा आटोपली असून, गोव्यातील साखळी फुटबॉल स्पर्धा अंतिम टप्प्यात आल्या आहेत.
Omicron Impact Football Tournament
Omicron Impact Football Tournament Dainik Gomantak
Published on
Updated on

दिल्ली, बंगळूर आणि पश्चिम बंगालमधील साखळी फुटबॉल स्पर्धा (Omicron Impact Football Tournament) आटोपली असून, गोव्यातील साखळी फुटबॉल स्पर्धा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. तिथल्या स्पर्धांत परदेशी खेळाडू खेळले असून, कोल्हापूरच्या फुटबॉल विश्वात यंदा मात्र त्यांचे कसब पाहता येणार नाही. कोरोना व ओमिक्रॉनचे (Omicron) कारण देत त्यांना प्रवेश नाकारल्याने काही स्थानिक संघांत अस्वस्थता आहे. ‘केएसए’ साखळी फुटबॉल स्पर्धा घेण्यास आधीच उशीर झाल्याची भावना फुटबॉलप्रेमींत दिसून आली आहे. संघांच्या नोंदणीस सुरुवात झाल्यानंतर वरिष्ठ गटातील पाच संघांनी नोंदणीस प्रतिसाद दिला आहे.

Omicron Impact Football Tournament
ICC Rankings Of Batsmenची यादी जाहीर; विराट 9व्या स्थानी

नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन केल्याने त्याची माहिती सर्व संघांना दिली असून खेळाडू व संघाच्या नोंदणीस मुदतवाढ दिली आहे. असे असले तरी परदेशी खेळाडूंचा स्थानिक संघातील पत्ता कट केला आहे. दरवर्षी वरिष्ठ गटातील संघ परदेशी खेळाडूंना स्थान देतात. त्यांचा खेळ फुटबॉलप्रेमींना पाहता यावा व त्यांच्यातील कौशल्य स्थानिक खेळाडूंना शिकता यावे, असा दुहेरी उद्देश त्यामागे आहे.

दोन वर्षे लॉकडाउनमुळे साखळी स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. आर्थिक कोंडी झाल्याने संघांत चिंतेचे सावट आले आहे. परदेशी खेळाडूंना ते मागतील ती किंमत देणे संघांना परवडणारे नव्हते, अशी बाजू मांडणारा एक गट तयार झाला आहे. काही संघ मात्र परदेशी खेळाडूंना संघात घेण्याच्या तयारीत आहेत. ज्या संघांना परदेशी खेळाडूंना घेणे शक्य आहे, त्यांना तशी परवानगी द्यायला हवी, असे त्यांचे म्हणणे आहे.

Omicron Impact Football Tournament
IND vs SA: अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीवर बोलले कोच राठोड

'दोन वर्षे कोरोना काळात स्पर्धा झाल्या नसल्याने संघांचा आर्थिक डोलारा कोलमडला आहे. त्यामुळे संघांच्या मागणीनुसार यंदा परदेशी खेळाडूंचा प्रवेश नाकारला आहे. स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, अशी भूमिका संघांनी घेतली आहे. परिणामी, ‘केएसए’चे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे.'

- प्रा. अमर सासने, फुटबॉल सचिव, ‘केएसए’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com