Olympic आयोजनाचा भारत प्रबळ दावेदार, मोदींचे गृहराज्य करणार होस्ट; क्रीडामंत्र्यांनी दिली माहिती

क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे की भारत ऑलिम्पिक आयोजनासाठी दावेदारी ठोकणार आहे.
Anurag Thakur and PM Narendra Modi
Anurag Thakur and PM Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

Sports Minister Anurag Thakur: ऑलिम्पिक ही जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा म्हणून ओळखली जाते. पण आजपर्यंत ही स्पर्धा कधीही भारतात खेळवण्यात आलेली नाही. पण आता ऑलिम्पिक 2036 स्पर्धेच्या आयोजनासाठी दावेदारी ठोकणार असल्याचे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.

अनुराग ठाकूर यांनी असेही सांगितले आहे की आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समीतीच्या (IOC) सप्टेंबर 2023 मध्ये होणाऱ्या बैठकीदरम्यान सर्व सदस्यांसमोर ऑलिम्पिक 2036 चा रोडमॅप सादर केला जाईल.

Anurag Thakur and PM Narendra Modi
Olympics 2036चं भारतात होणार आयोजन? रशिया मदत करण्यास तयार

अनुराग ठाकूर टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, 'जर भारत जी20 प्रेसेडेन्सी इतक्या मोठ्या स्तरावर आयोजित करू शकतो, तर मला खात्री आहे की सरकार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समीतीसह भारतासाठी ऑलिम्पिक यजमानपदाची दावेदारी ठोकण्यासाठी सक्षम असेल.'

'आम्हाला माहित आहे की 2032 पर्यंतचे आयोजक निश्चित झालेले आहेत. पण, 2036 नंतर आम्हाला आशा आहे आणि मला खात्री आहे भारत पूर्ण सज्ज असेल आणि ऑलिम्पिकसाठी दावेदारी ठोकेल.'

Anurag Thakur and PM Narendra Modi
Olympic: छंद हे माणसाला जगण्याचा अर्थ देतात. मी का जगतोय?

अनुराग ठाकूर असेही म्हणाले, 'भारत ऑलिम्पिक आयोजनाचा सकारात्मक प्रस्ताव मांडण्यासाठी सज्ज आहे. नाही म्हणण्यासाठी आपल्याकडे कोणतेही कारण नाही. जर भारत खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी एवढे प्रयत्न करत आहे, तर मला खात्री आहे की आपण फक्त ऑलिम्पिकचे आयोजन करू शकतो असे नाही, तर आपण त्याचे अगदी मोठ्या स्तरावर आयोजन करू शकतो.'

'क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची हीच योग्य वेळ आहे. जर भारत प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत असेल, तर खेळात का नाही? भारत ऑलिम्पिक 2036 आयोजनासाठी प्रस्ताव मांडण्याचा गांभीर्याने विचार करत आहे.'

याशिवाय अनुराग ठाकूर यांनी असेही म्हटले आहे की गुजरातमध्ये ऑलिम्पिकचे आयोजन होऊ शकते. तिथे हॉटेल्स, हॉस्टेल्स, विमानतळ आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहेत.

भारताने यापूर्वी एशियन गेम्स आणि राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन केले आहे. आता ऑलिम्पिकचे यजमानपदही भारताला मिळणार का हे पाहावे लागेल. दरम्यान, ऑलिम्पिक 2024 चे आयोजक फ्रान्स आहेत, तर 2028 चे आयोजक अमेरिका आणि 2032 चे आयोजक ऑस्ट्रेलिया आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com