Olympic Awareness Programme: पणजीतील दौडीत मुलांचा उत्साह

Olympic Awareness Programme: डेन कुएल्हो, कात्या कुएल्हो, रसेल लोबो, पर्ल कोलवाळकर, किओना रजनी या सेलर्सचा सत्कार
Olympic Awareness Programme: 
Runners participating in the race
Olympic Awareness Programme: Runners participating in the raceDainik Gomantak

पणजीः टोकियो ऑलिंपिक जागृती कार्यक्रम (Tokyo Olympic Awareness Programme) दौडीत मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. गोवा ऑलिंपिक असोसिएशनतर्फे (Goa Olympic Association) पणजीतील (Panaji) रस्त्यावर झालेल्या तीन किलोमीटरच्या दौडीचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे पन्नास धावपटूंनी त्यात भाग घेतला. पोलिस महासंचालक मुकेशकुमार मीणा यांनी दौडीस हिरवा बावटा दाखविला. यावेळी गोवा ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव गुरुदत्त भक्ता, निशा मडगावकर, राजेंद्र गुदिन्हो यांची उपस्थिती होती.

Olympic Awareness Programme: 
Runners participating in the race
Olympics Awareness Programme: गोव्यातील तिरंदाजांना गौरविले

दौडीत सायकलिंग असोसिएशन ऑफ गोवा, प्रोबाईक, गोवा ट्रायथलॉन असोसिएशन, ट्रायगोवा, विविध खेळातील खेळाडूंनी भाग घेतला. दौड उपक्रमास यंग इंडियन्स, सीआयआय, गोवा वाहतूक पोलिसांचे सहकार्य लाभले.जागृती उपक्रमांतर्गत सत्कार सोहळ्यात पणजी कदंब बसस्थानक संकुलात डेन कुएल्हो, कात्या कुएल्हो, रसेल लोबो, पर्ल कोलवाळकर, किओना रजनी या सेलर्सचा कमांडर अभिलाष टॉमी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गोवा यॉटिंग असोसिएशनचे अध्यक्ष सिद्धार्थ सातार्डेकर, सचिव किथ डिसोझा यांची उपस्थिती होती.

Olympic Awareness Programme: 
Runners participating in the race
Olympic 2020: आता विजेत्या स्टारसाठी लाईफ टाइम फ्री मुव्ही शोची ऑफर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com