World Cup 2023: भारतात रंगणार क्रिकेटचा कुंभमेळा! कधी आणि कुठे मिळणार तिकिट्स?

World Cup 2023: वर्ल्डकपमधील सामन्यांच्या तिकीट विक्रीला सुरुवात होण्याची चाहते आतुरतेने वाट पाहात आहे.
World Cup 2023
World Cup 2023Dainik Gomantak

ODI World Cup 2023 Tickets: भारतात यावर्षी वर्ल्डकप 2023 स्पर्धा खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. ही 13 वी वनडे वर्ल्डकप स्पर्धा असून या स्पर्धेची उत्सुकता आता चाहत्यांमध्येही पाहायला मिळत आहे. दरम्यान, या वर्ल्डकपमधील सामन्यांची तिकीट विक्रीला सुरुवात होण्याचीही चाहते आतुरतेने वाट पाहात आहे.

12 वर्षांनंतर वनडे वर्ल्डकप भारतात होत आहे. मीडियातील रिपोर्ट्सनुसार या वर्ल्डकपमधील सामन्यांसाठी ऑनलाईन, तसेच स्टेडियमवरही तिकिट्स मिळणार आहेत. दरम्यान, बीसीसीआय आणि आयसीसीकडून अद्यात तिकिटांसंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

World Cup 2023
World Cup 2023: भारत-पाकिस्तान यांच्यातील हाय व्होलेटेज सामन्याची तारीख बदलणार! 'ही' मोठी अपडेट आली समोर

मात्र, मीडियातील रिपोर्ट्सनुसार 10 ऑगस्टपासून बुक माय शो आणि पेटीएम या ऑनलाईन वेबसाईट्सवर ऑनलाईन तिकिट मिळतील. या दोन्ही वेबसाईटवर स्पर्धेचे अर्धी-अर्धी तिकिट विक्री केली जाणार आहे.

तसेच उपांत्य फेरीतील सामन्यांची तिकिटे पेटीएमवर मिळणार आहेत. त्याचबरोबर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आणि अंतिम सामन्याचे तिकिटे बुक माय शोवर मिळणार आहेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की जरी ऑनलाईन तिकिट खरेदी केली. तरी स्टेडियमवर जाऊन फिजिकल तिकिटे कलेक्ट करावी लागणार आहेत.

तसेच रिपोर्ट्सनुसार सामना असलेल्या स्टेडियमवर देखील तिकिट खरेदी करू शकता. खरंतर साधारणपणे वर्ल्डकपच्या वेबसाईटवरही तिकिट विक्री ऑनलाईन पद्धतीने होत असते. पण अद्याप याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.

World Cup 2023
World Cup 2023: 'हे' 5 संघ पोहचू शकतात सेमी-फायनलमध्ये, गांगुलीची मोठी भविष्यवाणी; पाकिस्तानबद्दलही दिली प्रतिक्रिया

वर्ल्डकपचा 46 दिवस रंगणार थरार

वर्ल्डकप 2023 स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान एकूण 46 दिवस होणार असून या स्पर्धेत 48 सामने खेळवण्यात येणार आहेत. हे सर्व 48 सामने हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलाकाता या 10 शहरांमध्ये होणार आहेत.

या स्पर्धेत भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड्स हे संघ सहभागी होणार आहेत.

भारतीय संघाचे 2023 वर्ल्डकपसाठी वेळापत्रक

  • 8 ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई

  • 11 ऑक्टोबर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली

  • 15 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद

  • 19 ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे

  • 22 ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड, धरमशाला

  • 29 ऑक्टोबर - भारत विरुद्ध इंग्लंड, लखनऊ

  • 2 नोव्हेंबर - भारत विरुद्ध पात्रता फेरीतून आलेला संघ, मुंबई

  • 5 नोव्हेंबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता

  • 11 नोव्हेंबर - भारत विरुद्ध पात्रता फेरीतून आलेला संघ, बंगळुरू

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com