World Cup 2023: 'हे' 5 संघ पोहचू शकतात सेमी-फायनलमध्ये, गांगुलीची मोठी भविष्यवाणी; पाकिस्तानबद्दलही दिली प्रतिक्रिया

Sourav Ganguly: वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कोणते 5 संघ प्रवेश करू शकतात, याबद्दल सौरव गांगुलीने अंदाज व्यक्त केले आहेत.
Sourav Ganguly
Sourav GangulyDainik Gomantak
Published on
Updated on

Sourav Ganguly picks five semi-final contenders for ICC Cricket World Cup 2023: भारतात यावर्षी वर्ल्डकप 2023 स्पर्धा खेळली जाणार आहे. 5 ऑक्टोबरपासून या वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. श्रीलंका आणि नेदरलँड्सने क्वालिफायर स्पर्धेतून या वर्ल्डकपसाठी पात्रता मिळवली आहे. त्यामुळे आता या वर्ल्डकपमध्ये खेळणारे सर्व 10 संघ निश्चित झाले आहेत.

वनडे वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत स्वतंत्रपणे स्पर्धेचे आयोजन करत आहे. यापूर्वी भारताने 1987, 1996 आणि 2011 मध्ये अन्य देशांसह संयुक्तपणे वनडे वर्ल्डकपचे आयोजन केले होते.

यंदा यजमान भारतीय संघाला या वर्ल्डकप विजयासाठी प्रबळ दावेदार म्हटले जात आहे. पण त्यांना अन्य संघांकडूनही कडवी लढत मिळू शकते. याबद्दल विविध आजी-माजी खेळाडू अंदाजही व्यक्त करत आहेत. भारताचा माजी कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही उपांत्य फेरीत पोहचू शकणाऱ्या 5 संघांचे अंदाज सांगितले आहेत.

Sourav Ganguly
World Cup 2023 Qualifiers: क्रिकेट भारतीयांच्या रक्तातच! जन्माने भारतीय असलेले 'हे' क्रिकेटर गाजवताहेत आखाती देशाचे मैदान

गांगुलीने RevSportz ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की 'उपांत्य फेरीत पोहचू शकणाऱ्या संघांचे अंदाज बांधणे कठीण आहे. पण ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारत पोहचू शकतात. तसेच तुम्ही न्यूझीलंडला मोठ्या स्पर्धेत कमी लेखू शकत नाही.'

'मी पाच संघ निवडेल, त्यात पाकिस्तानचाही समावेश करेल. पाकिस्तान पात्र ठरायला ठरले, तर भारत आणि पाकिस्तानचा उपांच्या सामना इडन गार्डन्सला होऊ शकतो.'

वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील एक सामना मुंबईला आणि एक कोलकाताला होणार आहे. तसेच जर पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला, तर त्यांचा सामना कोलकातालाच होणार आहे. त्यामुळे जर भारतही उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आणि त्यांचा सामना पाकिस्तानबरोबर होणार असेल, तर तो सामना कोलकाताला इडन गार्डन्सवर होऊ शकतो.

याशिवाय भारतीय संघाला गेल्या 10 वर्षात आयसीसी स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यात आलेल्या अपयशाबद्दलबी गांगुलीने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. नुकतेच जूनमध्ये भारताने कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्विकारला होता.

Sourav Ganguly
World Cup 2023: नेदरलँडचा धमाका, स्कॉटलंडला हरवून वनडे वर्ल्ड कपचं तिकीट केलं बुक

गांगुली म्हणाला, 'आपण कधी कधी महत्त्वाच्या क्षणी कामगिरी चांगली करत नाही. मला वाटत नाही मानसिक दबावामुळे असे होत असेल, तर हे अंमलबजावणी न झाल्याचे परिणाम आहेत. ते सर्व मानसिकदृष्ट्या मजबूत आहेत. आशा आहे की यावेळी ते विजेतेपदापर्यंत पोहचतील. भारताने कमीतकमी कसोटी चॅम्पियनशीच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता, हे सुद्धा यशच आहे. आणि नक्कीच आपल्याला संधी आहे.'

'आपल्याकडे चांगले खेळाडू आहे. आशा आहे की यावेळी आपण जिंकू. दबाव नेहमीच असतो. यापूर्वीही दबाव असायचा. अखेरच्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माने 5 शतके केले होते. मला खात्री आहे त्यावेळीही त्याच्यावर दबाव असेल. दबाव ही समस्या नाही.'

'मला विश्वास आहे की ते यशस्वी होण्याचा मार्ग शोधतील. राहुल द्रविड खेळत असतानाही कामगिरी करण्याचा दबाव होता आणि आता तो प्रशिक्षक आहे, त्यामुळे कामगिरी करून घेण्याचा त्याच्यावरही दबाव आहे. दबाव कधीही गेला नव्हता. मला वाटत नाही की दबाव समस्या आहे.'

दरम्यान, भारतीय संघ वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. तसेच भारताचा साखळी फेरीत पाकिस्तानविरुद्ध 15 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com