ODI World Cup 2023: अमिताभ बच्चन यांच्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रजनीकांत यांना वर्ल्ड कप 2023 चे गोल्डन तिकीट दिले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांना गोल्डन तिकीट दिले.
याआधी बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांना गोल्डन तिकीट मिळाले आहे.
वास्तविक, गोल्डन तिकीट हा एक प्रकारचा व्हीआयपी पास आहे, जो काही प्रसिद्ध लोकांना दिला जातो. गोल्डन तिकीट मिळाल्यानंतर स्टेडियममध्ये वर्ल्ड कपचे सामने पाहण्यासाठी लोकांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
म्हणजेच गोल्डन तिकीट मिळाल्यानंतर लोकांना सामना विनामूल्य पाहता येईल, असे आपण म्हणू शकतो. यासोबतच गोल्डन तिकीट असलेल्या लोकांना मोफत प्रवेश आणि इतर अनेक व्हीआयपी सुविधाही मिळतात.
दरम्यान, 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप 2023 सुरु होणार आहे. पहिला सामना इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे.
त्याचबरोबर, भारताचा (India) पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. बीसीसीआयने 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच केली आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेतील सर्व सामने 22 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यान खेळवले जातील.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीला पहिल्या दोन वनडेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. पहिल्या दोन सामन्यात रोहितच्या जागी केएल राहुल कर्णधार असेल. अंतिम सामन्यात रोहित शर्मा कर्णधार असेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.