दहा कर्णधार, एक लक्ष्य! World Cup 2023 स्पर्धेचे वाजले बिगूल, पाहा व्हिडिओ

World Cup 2023: वर्ल्डकप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून त्यापूर्वी आयसीसीने कर्णधारांच्या फोटो सेशनचा 'बिहाइंड द सीन' व्हिडिओ शेअर केला आहे.
World Cup 2023 Captains
World Cup 2023 CaptainsDainik Gomantak
Published on
Updated on

ICC OCI Cricket World Cup 2023 Captains Day :

भारतात यंदा 13 वा वनडे वर्ल्डकप रंगणार आहे. या स्पर्धेला गुरुवारपासून (5 ऑक्टोबर) सुरुवात होत आहे. आता या स्पर्धेचे बिगूल वाजले आहेत. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी बुधवारी (4 ऑक्टोबर) कॅप्टन्स डेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर म्हणजेच अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. त्याचमुळे या सामन्याच्या एक दिवस आधी या स्पर्धेत सहभागी झालेल्या 10 संघांचे कर्णधार अहमदाबादला कॅप्टन्स डेसाठी पोहचले होते.

यावेळी 10 कर्णधारांशी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री व इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार ओएन मॉर्गन यांनी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशीही कर्णधारांनी संवाद साधला. यानंतर या सर्व कर्णधारांचे वर्ल्डकप ट्रॉफीसोबत फोटोसेशन करण्यात आले.

World Cup 2023 Captains
World Cup 2023 Schedule: विराटच्या बर्थडेला आफ्रिकेचं आव्हान! 9 शहरात रंगणार भारताचे सामने; पाहा वेळापत्रक

दरम्यान, फोटो सेशनवेळी त्यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 2019 वर्ल्डकप विजेता कर्णधार मॉर्गन ट्रॉफी टेबलवर आणून ठेवतो, त्यानंतर यंदाच्या वर्ल्डकपमध्ये नेतृत्व करणारे कर्णधार वर पाहून हात करतात.

त्याचबरोबर आयसीसीने कॅप्टन्स डेचा बिहाइंड द सिन व्हिडिओही शेअर केला असून त्यात कर्णधार एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. तसेच त्यांचे फोटो सेशन होत असल्याचेही दिसत आहे. इतकेच नाही तर डब्ल्यूडब्ल्यूई रेस्टरल खली देखील सर्व कर्णधारांना भेटल्याचे दिसते. याशिवाय शर्ट, बॅट आणि स्टिकर्सवरही हे कर्णधार स्वाक्षरी करताना दिसले.

दरम्यान, आता गुरुवारपासून बहुप्रतिक्षित वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यंदा पहिल्यांदाच भारत स्वतंत्रपणे वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन करत आहे.

यापूर्वी 1987, 1996 आणि 2011 साली भारतात वर्ल्डकपचे सामने झाले होते, पण भारताबरोबर या स्पर्धांचे संयुक्तपणे यजमानपद पाकिस्तान आणि बांगलादेश देखील होते. पण यावेळी केवळ भारतच स्वतंत्रपणे यजमान असणार आहे.

World Cup 2023 Captains
World Cup 2023: रोहितच्या उत्तरानं बुचकाळ्यात पडलेल्या बटलरच्या मदतीला आला बाबर, पाहा Video

वर्ल्डकप 2023 स्पर्धा 5 ऑक्टोबरला सुरू होऊन 19 नोव्हेंबरला संपणार आहे. 46 दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेत 48 सामने खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने मिळून हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलाकाता या 10 शहरात होणार आहेत.

या स्पर्धेत भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स हे 10 संघ सहभागी झाले आहेत.

हे सर्व 10 संघ साखळी फेरीत एकमेकांविरुद्ध खेळतील. त्यानंतर पहिले चार संघ उपांत्य फेरीत खेळतील, तर उपांत्य सामन्यातील विजेते संघ 19 नोव्हेंबर रोजी अंतिम सामन्यात भिडणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com